श्रीमाताजींची प्रवचने (पुस्तक)
श्रीमाताजींची प्रवचने हे पुस्तक म्हणजे श्रीमाताजींच्या निवडक प्रवचनांचा मराठी अनुवाद आहे. ही प्रवचने १९३०-१९३१ या कालावधीतील आहेत. भा.द.लिमये आणि विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.[१]
श्रीमाताजींची प्रवचने (१९३०-१९३१) | |
लेखक | श्रीमाताजी |
अनुवादक | भा.द.लिमये व विमल भिडे |
भाषा | इंग्रजी-मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | प्रवचने |
प्रकाशन संस्था | संजीवन कार्यालय |
प्रथमावृत्ती | १९९० |
मालिका | श्रीमातृ-जन्म-शताब्दी ग्रंथमाला - पुष्प सातवे |
विषय | अध्यात्म |
पृष्ठसंख्या | ७७ |
आय.एस.बी.एन. | 81-7058-211-3 |
पुस्तकाची मांडणी
संपादनया पुस्तकामध्ये एकंदर २६ प्रकरणे आहेत.
श्रीमाताजींनी फुलांना आध्यात्मिक अर्थ दिले होते. यातील काही प्रकरणे त्या अर्थांचे अधिक स्पष्टीकरण करणारी आहेत.
इतर काही प्रकरणांमध्ये अध्यात्मविषयक काही मूलभूत संज्ञांचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. उदा. त्याग, श्रद्धा, शरणता, आत्मदान, आत्मसमर्पण, अभीप्सा.
यातील काही प्रकरणे कुतुहलाचे निरसन करणारी आहेत. उदा.पुनर्जन्म आणि पुनर्जन्माची आठवण, योगायोग, शास्त्रज्ञांचे आणि योग्याचे ज्ञान इत्यादी.
साधकांना उपयुक्त अशा काही गोष्टींचे विवेचनही यामध्ये करण्यात आले आहे. उदा. असत्यावर विजय, योगमार्गातील अडचणी, योग्य वृत्तीचे सामर्थ्य, कल्पनाशक्तीचे सामर्थ्य, मागे सरका.
पूर्णयोगाशी संबंधित असणाऱ्या काही महत्त्वाच्या पारिभाषिक संज्ञांचा विचारही काही प्रकरणांमध्ये करण्यात आला आहे. उदा. अतिमानस आणि अधिमानस, अतिमानसिक सिद्धी, अतिमानसाचे अवतरण इत्यादी.
संदर्भ
संपादन- ^ श्रीमाताजींची प्रवचने, श्रीअरविंद आश्रम, १९९०