श्रीधर बाळकृष्ण रानडे
श्रीधर बाळकृष्ण रानडे (जून २४, १८९२ - ?) हे मराठी कवी होते. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. मराठीतील पहिली विज्ञानकथा समजली जाणारी कथा त्यांनी १९१५ साली लिहिली [ संदर्भ हवा ]. पाश्चात्त्य साहित्यावरून प्रेरणा घेऊन त्यांनी लिखाण केले.[१]
श्रीधर बाळकृष्ण रानडे | |
---|---|
जन्म नाव | श्रीधर बाळकृष्ण रानडे |
टोपणनाव | यशवंत |
जन्म | जून २४, १८९२ |
मृत्यू | ? |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता |
त्यांच्या पत्नी मनोरमा श्रीधर रानडे यासुद्धा रविकिरण मंडळाच्या सदस्य होत्या.श्री.बा.रानडे हे मुंबईतील इस्माईल युसुफ महाविद्यालयात वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक होते.
जीवन
संपादनया लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |
श्रीधर रानडे आणि मनोरमा श्रीधर रानडे (विवाहापूर्वीचे नाव द्वारकाबाई हिवरगांवकर/ कि हिवरकर ?) हे दोघेही फर्गसन महाविद्यालयाचे विद्दार्थी होते.महाविद्द्यालयातील काही तासिकात एकाच वर्गात असत.महाविद्दालयाच्या मासिकातून दोघांनीही लिहिलेल्या कवितांच्या निमित्ताने दोघांचा घनीष्ठ परिचय झाला.परिचयानंतर दोघांचेही साहित्य अधिकच बहरास येत गेले.त्यामुळे त्यांदोघांची प्रसिद्धी आणि उल्लेख नेहमी बरोबरीनेच झाला. दोघे पुढेचालून विवाहबद्ध झाले.[२] उच्चशिक्षित व पेशाने शास्त्रज्ञ असलेले रानडे प्रसिद्ध कवी नसले, तरीही रविकिरण मंडळाचे कार्य तळमळीने करणारे सभासद होते. आपल्या पत्नीच्या वयाच्या अवघ्या २९ व्यावर्षी अकाली निधनानंतर श्रीधर रानडेंनी काव्यलेखन सोडले.[३]
श्रीधर रानडेंनी पुढे वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी 'मृत्यूच्या दाढेतून' ही गाजलेली कविता लिहिली होती.[४]
कविता
संपादनलेझिम चाले जोरात
संदर्भ
संपादन
- ^ लोकसत्ता.कॉम (गूगल कॅश आवृत्ती) - डॉ. मोना चिमोटे[मृत दुवा]
- ^ f http://yabaluri.org/TRIVENI/CDWEB/NewWaysinMarathiLiteraturemar31.htm. It is a snapshot of the page as it appeared on 23 Jan 2011 00:18:36 GMT.
- ^ हिस्ट्री ऑफ इंडियन लिटरेचर १९११ - १९५६. पृ. २०८, लेखकःशिशीर कुमार दास
- ^ मॉडर्न मराठी पोएट्री - अ रिमार्केबल डिकेड. लेखकः माधव ज्युलियन