शेषराव माधवराव मोहिते (१ ऑगस्ट, १९५६:व्हंताळ, उमरगा तालुका, उस्मानाबाद जिल्हा - ) हे ग्रामीण कादंबरीकार आणि शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला आणि शिक्षण व्हंताळ, बलसूर, परभणी येथे झाले.

शेषराव मोहिते
जन्म नाव शेषराव माधवराव मोहिते
जन्म ऑगस्ट १, इ.स. १९५६
व्हंताळ ता. उमरगा उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्रोफेसर
साहित्य प्रकार कादंबरी, समीक्षा
विषय सामाजिक, वैचारिक
चळवळ शेतकरी चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती असं जगणं तोलाचं
धूळपेरणी
पत्नी मीनाक्षी
अपत्ये रोहित, सत्यजीत
पुरस्कार
  • ‘शोध गुणवत्तेचा’ (२००२) या प्राचार्य अनिरुद्ध जाधव, गौरवग्रंथ.
  • ‘ऐहिक माझे’ (२०१७) डॉ. सूर्यनारायण रणसूभे यांच्या निवडक वैचारिक लेखांच्या संग्रहाचे संपादन केले.
  • ‘असं जगणं तोलाचं’ (१९९४) या कादंबरीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा वा.म.जोशी सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार (१९९४)
  • भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान, औरंगाबाद यांचा शेतकरी साहित्य पुरस्कार (१९९९)
  • ‘धूळपेरणी’ (२००१) या कादंबरीस यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा यांचा बाबा पद्मनजी उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (२००२)
  • मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार (२००२)
  • महाराष्ट्र शासनाचा हरि नारायण आपटे उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार (२००२)
  • जालन्याच्या ऊर्मी प्रतिष्ठानचा मुक्ताई पुरस्कार (२०१२)
  • अध्यक्ष : तिसरे अ.भा. शेतकरी साहित्य संमेलन, गडचिरोली २६ फेब्रुवारी २०१७.

कृषी विस्तार या विषयासाठी डॉ.जी.जी.नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. ही पदवी मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे १९८८ मध्ये पूर्ण केली. विद्यार्थिदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीचे संयोजक म्हणून (१९८० - ८१) जबाबदारी सांभाळली. १९८० पासून शेतकरी चळवळीत सक्रीय. शेतकरी चळवळ, जेम्स हेरियेट, अलेक्स हॅले, मुन्शी प्रेमचंद्र, ल्युओ टॉलस्टॉय, मॅग्झीन गॉर्की, साने गुरुजी, जी.ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, उद्धव शेळके, दया पवार यांच्या साहित्याच्या वाचनातून वाड्.मयीन जडणघडण झाली. विद्यार्थी दशेत मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सिनियर रिसर्च फेलो म्हणून १९८५ – ८६ याकाळात काम केले. १९८६ पासून राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे पीकशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून काम केले.

प्रकाशित साहित्य संपादन

  • ‘बरा हाय घरचा गोठा’ (१९८३ - कथासंग्रह)
  • ‘पंधरा ऑगस्ट कवा हाय’ ही कविता बरीच गाजली.
  • ‘असं जगणं तोलाचं’ ( कादंबरी - १९९४)
  • ‘धूळपेरणी’ (कादंबरी-२००१)
  • ‘शेती व्यवसायावरील अरिष्ट’ (२००७)
  • ‘बोलिलो जे कांही’ (ललित लेखसंग्रह - २०१०)
  • ‘ग्रामीण साहित्य : बदलते संदर्भ’ (२०१२)

पुरस्कार आणि सन्मान संपादन

  • ‘शोध गुणवत्तेचा’ (२००२) या प्राचार्य अनिरुद्ध जाधव गौरवग्रंथाचे संपादन.
  • ‘ऐहिक माझे’ (२०१७) डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्या निवडक वैचारिक लेखांच्या संग्रहाचे संपादन.
  • ‘असं जगणं तोलाचं’ (१९९४) या कादंबरीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा वा.म. जोशी सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार (१९९४)
  • भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार, शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान, औरंगाबाद यांचा शेतकरी साहित्य पुरस्कार (१९९९)
  • ‘धूळपेरणी’ (२००१) या कादंबरीस यशवंतराव दाते स्मृती संस्था, वर्धा यांचा बाबा पदमनजी उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (२००२)
  • मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार (२००२)
  • महाराष्ट्र शासनाचा हरि नारायण आपटे उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार (२००२)
  • ऊर्मी प्रतिष्ठान, जालना यांजकडून मुक्ताई पुरस्कार (२०१२)
  • अध्यक्ष : तिसरे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन, गडचिरोली २६ फेब्रुवारी २०१७.
  • अध्यक्ष : शेषराव मोहिते हे १४ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या ३४व्या कडोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते.

संदर्भ संपादन