शेर्पा हा प्रामुख्याने हिमालय परिसरात वास्तव्य करणारा एक वांशिक समूह आहे. शेर्पा लोक प्रामुख्याने नेपाळ देशात तसेच चीनच्या तिबेट भागात आढळतात. त्याचबरोबर भूतान तसेच भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये (प्रामुख्याने सिक्कीम) देखील शेर्पा लोक वसले आहेत. प्रामुख्याने बौद्ध धर्मीय असलेले शेर्पा लोक नेपाळीशेर्पा ह्या भाषा वापरतात. आजच्या घडीला जगभर शेर्पा लोकांची लोकसंख्या सुमारे ५.२ लाख इतकी आहे.

माउंट एव्हरेस्ट ह्या जगातील सर्वात उंच पर्वतशिखरावर यशस्वी चढाई करणारा शेर्पा तेनझिंग नोर्गे हा जगातील सर्वात पहिला गिर्यारोहक होता.

शेर्पा लोक प्रामुख्याने त्यांच्या गिर्यारोहण कौशल्यासाठी ओळखले जातात. हिमालयामधील माउंट एव्हरेस्टसह बहुतेक सर्व दुर्गम शिखरे चढण्यासाठी गिर्यरोहकांकडून शेर्पांची मदत घेतली जाते.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत