शामोनि

(शॅमोनी या पानावरून पुनर्निर्देशित)

शामोनि तथा शामोनि-माँट-ब्लांक हे फ्रांसच्या ऱ्होन-आल्प्स प्रदेशाच्या हाउत-साव्वा प्रांतात असलेले छोटे गाव आहे. हे गाव पहिल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. ९,८०० लोकसंख्या असलेल्या या गावात एकाचवेळी ६०,००० पर्यटकांची राहण्याची सोय होऊ शकते.

शामोनि गाव व आसपासचे खोरे

हे शहर युरोपमधील सर्वोच्च शिखर माँट ब्लांकच्या पायथ्याशी वसलेले असून ऐग्विल दु मिडी हे दुसरे मोठे पर्वतशिखर येथून जवळ आहे. येथे स्कीईंग व इतर हिवाळी खेळांसाठीची सोय आहे.