शून्य मशागत तंत्रज्ञान

नो-टिल फार्मिंग किंवा शून्य मशागत तंत्रज्ञान हे मशागतीद्वारे जमिनीची फारशी मशागत न करता पिके किंवा कुरण वाढविण्याचे एक कृषी तंत्र आहे. शून्य मशागत तंत्रज्ञानाची शेती केल्याने जमिनीत, विशेषतः उतार असलेल्या भूभागावरील वालुकामय आणि कोरड्या जमिनीत जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते. याव्यतिरिक्त जमिनीत शिरणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ, सेंद्रिय पदार्थ मातीत टिकून राहणे आणि पोषक सायकल चालवणे यांचा समावेश होतो. या पद्धतींमुळे जमिनीखाली आणि पृष्भागावरील नैसर्गिक जीवजंतूच्या प्रमाणात आणि विविधतेत वाढ दिसून येते. रासायनिक पद्धतीत तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर केला जातो, तर सेंद्रिय पद्धतीत तण दाबण्यासाठी आच्छादन पिके लावून त्याचे अवशेष आच्छादन म्हणून वापरतात.[]

शून्य मशागत तंत्रज्ञानाच्या तीन मूलभूत पद्धती आहेत. "सॉड सीडिंग" म्हणजे जेव्हा पिकांची पेरणी यंत्राच्या साहाय्याने आच्छादन असलेल्या पिकावर तणनाशकांचा वापर करून तयार केलेल्या सॉडमध्ये केली जाते. "थेट बीजन" म्हणजे जेव्हा पिके मागील पिकाच्या अवशेषांमधून पेरली जातात. "सरफेस सीडिंग" किंवा "थेट सीडिंग" म्हणजे जेव्हा पिकांचे अवशेष जमिनीच्या पृष्ठभागावर तसेच सोडले जातात, यामुळे मशागतीची यंत्रसामग्री आणि शारीरिक श्रम फारसे लागत नाहीत.[]

आज शेतीमध्ये मशागतीचे फार महत्व आहे, परंतु काही प्रमाणात नो-टिल पद्धती यशस्वी होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये किमान मशागत किंवा लो-टिल पद्धती आणि नो-टिल पद्धती एकत्र करतात. उदाहरणार्थ, काही पद्धतींमध्ये उथळ मशागत वापरली जाऊ शकते परंतु नांगरणी केली जात नाही किंवा पट्टी मशागतीचा वापर केला जात नाही.

शून्य मशागत तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी

संपादन

मशागत म्हणजे यांत्रिक पद्धतीद्वारे शेतीची तयारी, विशेषतः मागील हंगामात वाढलेले तण आणि मागील पिकांचे अवशेष काढून टाकणे. मशागत केल्याने अपेक्षित झाडांची वाढ होण्यासाठी एक सपाट किंवा उंच बेड यासारखे क्षेत्र तयार केले जाऊ शकते. ही एक पारंपरिक पद्धत आहे जी किमान पाच हजार वर्षांपासून वापरत आहे.[]


मशागतीच्या परिणामांमध्ये माती घट्ट होणे, सेंद्रिय पदार्थांचे नुकसान, मातीचा ऱ्हास, मातीतील सूक्ष्मजंतू आणि मायकोरिझा, आर्थ्रोपॉड्स आणि गांडुळांसह इतर जीवांचा मृत्यू किंवा त्यांचे नुकसान होत असते.[] तसेच मातीची धूप होते, म्हणजे वरची माती वाहून जाते किंवा उडून जाते.

प्लॉमन्स फॉलीचे लेखक एडवर्ड 'एच. फॉल्कनर' यांनी 1940 मध्ये आधुनिक शून्य मशागत तंत्रज्ञानाने शेतीची सुरुवात केली.[] परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर पॅराक्वॅटसारख्या शक्तिशाली तणनाशकांचा विकास होईपर्यंत यात फारशी गती आली नव्हती. नो-टिलचा पहिला स्वीकार करणाऱ्यांमध्ये क्लिंगमन (उत्तर कॅरोलिना), एडवर्ड फॉल्कनर, एलए पोर्टर (न्यू झीलंड), हॅरी आणि लॉरेन्स यंग (हर्ंडन, केंटकी), हर्बर्ट बार्ट्झसह इन्स्टिट्यूटो डी पेस्क्विसास ऍग्रोपेक्युरियास मेरिडिओनल (ब्राझीलमध्ये 1971) यांचा समावेश होतो.[]

जगभरात शून्य मशागत तंत्रज्ञानाच्या वापरत चांगली वाढ झाली आहे. १९९९ मध्ये, जगभरात सुमारे ४५ दशलक्ष हेक्‍टर क्षेत्र बिनशेतीखाली होते, जे २००३ मध्ये ७२ दशलक्ष हेक्‍टर आणि २००९ मध्‍ये १११ दशलक्ष हेक्‍टर इतके वाढले.[]

नफा, अर्थशास्त्र आणि उत्पन्न

संपादन

काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, काही बाबतीत शून्य मशागत तंत्रज्ञान अधिक फायदेशीर ठरू शकते.[][] काही बाबतीत ते परिश्रम, इंधन,[१०] सिंचन,[११] आणि यंत्रसामग्री वरील खर्च कमी करते.[] शून्य मशागत तंत्रज्ञानामुळे जास्त पाणी जिरणे तसेच पाण्याची धारणा क्षमतेत वाढ आणि जमिनीची कमी धूप यामुळे उत्पन्न वाढवू शकते. आणखी एक संभाव्य फायदा असा आहे की जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने, रब्बीत शेत पडीक ठेवण्याऐवजी दुसरे पीक लावणे अधिक फायद्याचे ठरू शकते.[१२]

शून्य मशागत तंत्रज्ञानाची समस्या अशी आहे की वसंत ऋतूमध्ये हळूहळू कोरडी होते, ज्यामुळे लागवड करण्यास उशीर होऊ शकतो. ज्यामुळे कापणी उशिरा होऊ शकते.[१३]

शून्य मशागत तंत्रज्ञानाची समस्या अशी आहे की जर अंमलबजावणी प्रक्रियेमुळे उत्पादन कमी झाले तर इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाढत्या मजुरीच्या खर्चाच्या प्रमाणात यात नफा देखील कमी होऊ शकतो. इंधन आणि मजुरांच्या किमती सतत वाढत असल्याने, शेत आणि शेती उत्पादनांसाठी शून्य मशागत तंत्रज्ञानाकडे वळणे अधिक व्यावहारिक ठरू शकते.[१४] [१५]

शून्य मशागत तंत्रज्ञान पद्धती वापरल्याने होणारे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे मिळण्यास सोळा ते एकोणीस वर्षे लागू शकतात.[१६] अंमलबजावणी केल्याच्या पहिल्या दशकात अनेकदा महसूल घटण्याचा प्रकार दिसून येऊ शकतो. दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी ही पद्धत वापरल्यास नफ्यात चांगली वाढ होते.[१६]

संदर्भ

संपादन
  1. ^ "What is No-Till Farming?". Regeneration International (इंग्रजी भाषेत). 2018-06-24. 2020-11-06 रोजी पाहिले.
  2. ^ Willy H. Verheye, ed. (2010). "Soil Engineering and Technology". Soils, Plant Growth and Crop Production Volume I. EOLSS Publishers. p. 161. ISBN 978-1-84826-367-3.
  3. ^ name=history of tillage Archived 2016-01-07 at the Wayback Machine.
  4. ^ Preston Sullivan (2004). "Sustainable Soil Management". Attra.ncat.org. 2007-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-09 रोजी पाहिले.
  5. ^ "Is Organic Farming Better for the Environment? | Genetic Literacy Project". geneticliteracyproject.org (इंग्रजी भाषेत). 16 February 2017. 2018-01-09 रोजी पाहिले.
  6. ^ Derpsch, Rolf. "A short History of No-till". NO- TILLAGE. 1 May 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 March 2011 रोजी पाहिले.
  7. ^ Derpsch, Rolf (January 2010). "Current Status of Adoption of No-Till Farming in the World and some of its Main Benefits". Research Gate. 23 October 2020 रोजी पाहिले.
  8. ^ D.L. Beck, J.L. Miller, and M.P. Hagny "Successful No-Till on the Central and Northern Plains"
  9. ^ a b Derpsch, Rolf. "Economics of No-till farming. Experiences from Latin America" (PDF). 2011-07-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2010-05-09 रोजी पाहिले.
  10. ^ NRCS. "USDA-NRCS Energy Consumption Awareness Tool: Tillage". ecat.sc.egov.usda.gov. 2020-06-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-26 रोजी पाहिले.
  11. ^ Network, University of Nebraska-Lincoln | Web Developer (2015-09-17). "How Tillage and Crop Residue Affect Irrigation Requirements - UNL CropWatch, April 5, 2013". CropWatch (इंग्रजी भाषेत). 2018-01-31 रोजी पाहिले.
  12. ^ "Yield & Economic Comparisons: University Research Trials" (PDF). p. 1. 19 May 2005 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित.
  13. ^ Network, University of Nebraska-Lincoln | Web Developer (2015-09-17). "Setting Planting Equipment for Successful No-till". CropWatch (इंग्रजी भाषेत). 2018-01-23 रोजी पाहिले.
  14. ^ Osei, E; Moriasi, D; Steiner, J; Starks, P; Saleh, A (2012). "Farm-level economic impact of no-till farming in the Fort Cobb Reservoir Watershed". Journal of Soil and Water Conservation. 67 (2): 75–86. doi:10.2489/jswc.67.2.75.
  15. ^ Lal, R.; Reicosky, D.C.; Hanson, J.D. (March 2007). "Evolution of the plow over 10,000 years and the rationale for no-till farming". Soil and Tillage Research. 93 (1): 1–12. doi:10.1016/j.still.2006.11.004. ISSN 0167-1987.
  16. ^ a b Cusser, Sarah; Bahlai, Christie; Swinton, Scott; Robertson, G. Philip; Haddad, Nick M. (2020). "Long-term research avoids spurious and misleading trends in sustainability attributes of no-till". Global Change Biology. 26 (6): 3715–3725. Bibcode:2020GCBio..26.3715C. doi:10.1111/gcb.15080. PMID 32175629.