शीला दीक्षित
भारतीय राजकारणी
(शीला दिक्षीत या पानावरून पुनर्निर्देशित)
शीला दीक्षित (रोमन लिपी: Sheila Dikshit जन्म : ३१ मार्च १९३८; - २० जुलै २०१९) या भारतीय राजकारणी होत्या. [१]भारतातील दिल्ली राज्याच्या त्या मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या.
शीला दिक्षित | |
कार्यकाळ ३ डिसेंबर १९९८ – २८ डिसेंबर २०१३ | |
मागील | सुषमा स्वराज |
---|---|
पुढील | अरविंद केजरीवाल |
जन्म | ३१ मार्च, १९३८ कपुरथाला, पंजाब,भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
त्या दिल्लीच्या सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होत्या. तसेच कोणत्याही भारतीय राज्याच्या सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्यांनी 1998 पासून 15 वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. दीक्षित यांनी काँग्रेस पक्षाला दिल्लीत सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिला. त्यांना आधुनिक दिल्लीचे शिल्पकार मानले जाते.
१९८४ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कनोज लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
संदर्भ
संपादन- ^ "Sheila Dikshit: Age, Biography, Education, Husband, Caste, Net Worth & More - Oneindia". www.oneindia.com (इंग्रजी भाषेत). 2021-12-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-12-31 रोजी पाहिले.