शीतल महाजन ह्या एक भारतीय  प्रोफेशनल  स्कायडायव्हर/ पॅराशूट जंम्पर आहे. २००४ पासून ह्या स्कायडायव्हिंग (पॅराशूट जंपिंग) या खेळात जागतिक स्पर्धांत भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

शीतल महाजन
जन्म १९ सप्टेंबर १९८२
पुणे
टोपणनावे क्वीन ऑफ स्काय, जंप क्वीन, फ्लाईंग बर्ड
पेशा पॅराशूट जंपिंग खेळाडू
कारकिर्दीचा काळ २००४ पासून पुढे
प्रसिद्ध कामे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण ध्रुवावरून पॅराशूट जंप, जगातील सर्व सातही खंडांवर पॅराशूट जंप
जोडीदार वैभव राणे
अपत्ये जुळी मुले वृषभ, वैष्णव
वडील कमलाकर महाजन
आई ममता महाजन
नातेवाईक बहिणाबाई चौधरी
पुरस्कार पद्मश्री, तेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहस पुरस्कार

बालपण संपादन

शीतल महाजन यांचा जन्म पुण्यात झाला असून, मूळचे गाव जळगाव असलेली शीतल ही बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. बहिणाबाई चौधरीचे नातू कमलाकर महाजन यांची सुकन्या. बालपणापासूनच शीतलला काहीतरी नवे करण्याचा ध्यास होता. यातच तिला पॅराशूट जंपिंगची आवड निर्माण झाली.

शीतल महाजन यांनी १७ सप्टेंबर २०१७ पर्यंत ७०० पॅराशूट जंप केल्या आहेत. त्यापैकी काही १३,५०० फुटावरून आणि काही १८,००० फुटावरून केल्या आहेत. त्यांची एक पॅराशूटउडी ही ऑक्सिजनच्या सहाय्याने ३० हजार फुटांवरून केली आहे. ७ विविध प्रकारच्या विमानांतून जगातील सातही खंडांतील विविध ठिकाणांवर, जसे की उत्तर ध्रुव (आर्क्टिक) आणि दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका) आणि भारत व फिनलॅन्ड, अमेरिका, स्पेन ,ऑस्ट्रेलिया, युरोप, साऊथ आफ्रिका, साऊथ अमेरिका येथे त्यांनी पॅराशूट जंप केल्या आहे .

शीतल महाजन यांनी ॲरिझोना येथे व्हर्टिकल विन्ड टनलमध्ये दहा तासांचे ट्रेनिंग घेतले आहे. शिवाय डिसेंबर २००७ मध्ये भारतीय हवाई दलातील प्रशिक्षकांकडून स्कायडायव्हिंगचे बेसिक ट्रेनिंग घेतले आहे.

शीतल महाजन यांची पॅराशूट जंपिंगमधील कारकीर्द संपादन

  • कामगिरी : - १७ राष्ट्रीय आणि ६ जागतिक विक्रम. 

हे ६ जागतिक विक्रम खालील प्रमाणे : -' 

१.    १८ एप्रिल २००४ रोजी उत्तर धुवावर (आर्क्टिक) जेथे जमीनच नाही, म्हणजे समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यावर पॅराशूटच्या साहाय्याने कुठलाही सराव न करता मायनस ३७ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये २, ४०० फुटावरून स्टॅटिक लाईन याप्रकारची पॅराशूट जंप. हा एक जागतिक विक्रम आहे. 

२.      १५ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका)वर मायनस ३८ डिग्री सेल्सियस तापमानामध्ये ११,६०० फुटावरून कुठलाही सराव न करता ॲक्सलरेटेड फ्री फॉल या प्रकारची पॅराशूट जंप करून शीतल महाजन यांनी दुसरा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. 

३.      पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर (उत्तर व दक्षिण) पॅराशूटच्या सहाय्याने कुठलाही सराव न करता पॅराशूट जंप करणारी शीतल महाजन ही जगातील पहिली महिला ठरली. पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर पॅराशूट जंप करणारी शीतल महाजनहि ही सर्वात लहान वयाची पहिली भारतीय महिला ठरली आहे.

४.      दक्षिण ध्रुवावर ॲक्सलरेटेड फ्री फॉल या प्रकारची पॅराशूट जंप यशस्वीपणे पार पाडणारी जगातील पहिल्या तुकडीचे नेतृत्व शीतल महाजन यांनी केले होते.

५.      २५ ऑगस्ट २०१४ रोजी स्पेन - एम्पुरीआब्रावा ह्या परदेशी भूमीवर ८९ भारतीय नागरिकांनी एका दिवसात टॅन्डम स्कायडायव्हिंग करून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला. शीतल महाजन ह्यांनी या जागतिक विक्रमाचे आयोजन केले होते, व त्यांच्या नेतृत्वाखाली हा विश्व विक्रम यशस्वीपणे पार पडला.

६.      २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पृथ्वीच्या सर्व ७ खंडांवर (कॉन्टिनेन्टवर) म्हणजे १. अंटार्क्टिका २. ऑस्ट्रेलिया - ब्रिसबेन ३. आशिया - भारत ४. आफ्रिका - जोहान्सबर्ग ५. युरोप - स्पेन, फिनलँड ६. नॉर्थ अमेरिका - कॅलिफोर्निया ७. साऊथ अमेरिका - ब्राझील येथे स्कायडायविंग / पॅराशूट जंप करणारी शीतल महाजन ही जगातील पहिली महिला ठरली. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी तिला १० वर्ष २ महिने ६ दिवस लागले.

७. शीतल महाजन आणि वैभव राणे यांनी १९ एप्रिल २००८ रोजी हॉट एर बलूनमध्ये हवेत ६०० ते ८०० फूट उंचीवर मंगलाष्टके,  फेरे,  कन्यादान आदी सर्व विधींसहित त्यांचे भारतीय पद्धतीचे लग्न पार पाडले. हे भारतीय पद्धतीने हवेत केलेले पहिले लग्न  ठरले.

८.     १९ सप्टेंबर २०१० रोजी स्पेन ह्या परदेशी भूमीवर १३००० फुटांवरून विंग सूट / बर्डम्यान सूट घालुन जंप करणारी शीतल महाजन ही पहिली भारतीय महिला ठरली आहे.  

९.      २३ ऑक्टोबर २०११ रोजी अमेरिकेमध्ये स्कायडाइव्ह ॲरिझोना येथे समुद्रसपाटी पासून सर्वाधिक उंचीवरून म्हणजेच ५८०० फुटांवरून, हॉट एर बलूनमधून पॅराशूट जंप करणारी शीतल महाजन ही पहिली भारतीय सामान्य नागरिक महिला ठरली. ह्याआधी इतरांनी हॉट एर बलूनमधून केलेल्या पॅराशूट जंप समुद्रसपाटीपासून ५५०० फूट उंचीपेक्षा कमी उंचीवरून केलेल्या होत्या.

१०.      सन २०११ मध्ये युनायटेड स्टेट्स पॅराशूटिंग असोसिएशनचे पॅराशूटिंग / स्कायडायव्हिंग या खेळाचे लायसन्स मिळविणारे वैभव राणे आणि शीतल महाजन हे दोघे पहिले भारतीय सामान्य नागरिक जोडपे ठरले.

११.   ११/११/२०११ रोजी युनायटेड स्टेट्स पॅराशूटिंग असोसिएशनचे पॅराशूटिंग / स्कायडायव्हिंग या खेळातील कोच रेटिंगचे लायसन्स मिळवून शीतल महाजन ही पहिल्या भारतीय सामान्य नागरिक महिला स्कायडायव्हिंग कोच / प्रशिक्षक ठरली  आहे.

१२.   ६ ते ९ सप्टेंबर २०१२ मध्ये कॅलिफोर्निया येथे हवेत १८००० फूट उंचीवर झालेल्या ७९ वे स्कायडायव्हिंग फॉरमेशन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी  शीतल महाजन हि पहिली भारतीय सामान्य नागरिक महिला ठरली आहे.

१३.  १२/१२/१३ रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या शुभेच्छाचे ग्रीटिंग कार्ड हातात घेऊन ११,००० फुटांवरून बारामती विमानतळावर स्कायडायव्हिंग / पॅराशूट जंप करून शीतल महाजन यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारतात पहिल्यांदा अशा प्रकारच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. 

१४.  ०४ मे २०१६ रोजी युनायटेड स्टेट्स पॅराशूट असोसिएशनचे पॅराशूटिंग / स्कायडायव्हिंग या खेळातील ऍकूरसी व फॉर्मेशन स्कायडायव्हिंगया २ वेगवेगळया प्रकारामध्ये जज (पंच / न्यायाधीश) रेटिंगचे लायसन्स मिळवून शीतल महाजन ह्या पहिल्या भारतीय सामान्य नागरिक महिला स्कायडायव्हिंग जज (पंच / न्यायाधीश) ठरल्या आहेत.

१६.  २० मे २०१७ रोजी कॅलिफोर्नियामध्ये ३०,५०० फुटांवरून हॅलो जंप (हाय अल्टिट्यूड लो ओपनिंग जंप) करणारी पहिली भारतीय नागरिक महिला ठरली. 

गौरव संपादन

१. २४ मार्च २०११ रोजी शीतल महाजन राणे यांना भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते भारतातील सर्व उच्च चौथा नागरिक पुरस्कार "पद्मश्री" प्राप्त झाला आहे.

२. उत्तर ध्रुवावरील साहसी पराक्रमासाठी, २९ ऑगस्ट २००६ रोजी शीतल महाजन यांना भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते "तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार" प्राप्त झाला आहे.

३. उत्तर ध्रुवावरील साहसी पराक्रमासाठी, शीतल महाजन यांना २००४-०५चा शिवछत्रपती महाराष्ट्र राज्य क्रीडा विशेष पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी २००५ रोजी देण्यात आला आहे

४. शीतल महाजन यांना २०१७ सालच्या मे महिन्यात सर्व ७ खंडांवर स्कायडायव्हिंग पूर्ण करण्याच्या कामगिरीसाठी एरो क्लब ऑफ इंडिया कडून एफ.ए.आय.च्या (फेडरेशन ऑफ ॲराॉनाॅटिक इंटरनॅशनल)च्या “सबिहा गोकसन इंटरनॅशनल गोल्ड मेडल” साठी निवड होऊन नामांकित  करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या शीतल महाजन या पहिल्या भारतीय महिला आहेत. 

संदर्भ संपादन