शिव स्मारक

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मुंबई

शिव स्मारक किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ मुंबईत बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटी जवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आधारासह एकूण उंची २१२ मीटर असणार आहे. चीनमधील २०८ मीटर उंचीच्या स्प्रिंग टेंपल बुद्धापेक्षा याची उंची वाढवण्यात आली आहे.[] या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.

छत्रपती शिवाजी महाराज

इतिहास

संपादन

२४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिव स्मारकाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता.[] २०२१ पर्यंत याचे काम पूर्ण होईल, हा महाराष्ट्र सरकारचा दावा आहे.

वैशिष्ट्ये

संपादन

स्मारकाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • १६.८६ हेक्टर क्षेत्रफाच्या खडकावर स्मारक निर्माण केले जाईल. हे स्थळ गिरगांव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर, नरिमन पॉईंटपासून २.६ किलोमीटर, तर राजभवनपासून १.२ किलोमीटर अंतरावर असेल.
  • स्मारकाची तटबंदीला भिंत असेल, आत प्रवेश केल्यावर तुळजा भवानीचे एक मंदिर राहील.
  • शिवाजी महाराज यांच्या जीवनातील दृश्ये दाखवणारे देखावे असतील. कलासंग्रहालय आणि ग्रंथालयसुद्धा असेल.
  • याला एकूण ३,६०० कोटी रुपये खर्च लागणार आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "शिवपुतळ्याची उंची होणार २१० मीटर -Maharashtra Times". महाराष्ट्र टाइम्स. 2017-03-26. 2018-05-08 रोजी पाहिले.
  2. ^ "'अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवा'". लोकसत्ता. 2017-03-25. 2018-05-08 रोजी पाहिले.