शिवाजीराव पाटील निलंगेकर
(शिवाजीराव निलंगेकर पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
शिवाजीराव निलंगेकर पाटील (९ फेब्रुवारी, इ.स. १९३१ - ५ ऑगस्ट २०२०, पुणे[१]) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ३ जून, इ.स. १९८५ ते ६ मार्च, इ.स. १९८६ या कालखंडात ते महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारांपैकी सगळ्यात छोटा कालखंड आहे.[२]
शिवाजीराव निलंगेकर पाटील | |
कार्यकाळ ३ जून, इ.स. १९८५ – ६ मार्च, इ.स. १९८६ | |
मागील | वसंतदादा पाटील |
---|---|
पुढील | शंकरराव चव्हाण |
जन्म | ९ फेब्रुवारी, इ.स. १९३१ निलंगा |
मृत्यू | ५ ऑगस्ट २०२० पुणे |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्ट केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
संक्षिप्त परिचय
संपादन- भूषविलेली अन्य पदे : राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य. मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते.
- १९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद.
- सध्या आमदार. राजकीय वारसदार पुत्र कै. दिलीप हे आमदार होते.
- सून रूपाताई या लातूरच्या माजी खासदार.
- नातू संभाजी हे निलंग्याचे माजी आमदार. (आजोबांचा पराभव करून आमदारकी)
- मुख्यमंत्रीपदाचा कालावधी: ३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६ पक्ष : काँग्रेस
- पहिल्यांदा आमदार १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघ.
मागील: वसंतदादा पाटील |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ३ जून, इ.स. १९८५ – ६ मार्च, इ.स. १९८६ |
पुढील: शंकरराव चव्हाण |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Shivajirao Patil-Nilangekar : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन". Maharashtra Times. 2020-08-08 रोजी पाहिले.
- ^ Shivajirao Nilangekar Patil History