शिवाजीराव पाटील निलंगेकर

(शिवाजीराव निलंगेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवाजीराव निलंगेकर पाटील (९ फेब्रुवारी, इ.स. १९३१ - ५ ऑगस्ट २०२०, पुणे[१]) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ३ जून, इ.स. १९८५ ते ६ मार्च, इ.स. १९८६ या कालखंडात ते महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारांपैकी सगळ्यात छोटा कालखंड आहे.[२]

शिवाजीराव निलंगेकर पाटील

कार्यकाळ
३ जून, इ.स. १९८५ – ६ मार्च, इ.स. १९८६
मागील वसंतदादा पाटील
पुढील शंकरराव चव्हाण

जन्म ९ फेब्रुवारी, इ.स. १९३१
निलंगा
मृत्यू ५ ऑगस्ट २०२०
पुणे
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्ट केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

संक्षिप्त परिचय

संपादन
  • भूषविलेली अन्य पदे : राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य. मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात महसूल हे खाते.
  • १९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद.
  • सध्या आमदार. राजकीय वारसदार पुत्र कै. दिलीप हे आमदार होते.
  • सून रूपाताई या लातूरच्या माजी खासदार.
  • नातू संभाजी हे निलंग्याचे माजी आमदार. (आजोबांचा पराभव करून आमदारकी)
  • मुख्यमंत्रीपदाचा कालावधी: ३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६ पक्ष : काँग्रेस
  • पहिल्यांदा आमदार १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघ.
मागील:
वसंतदादा पाटील
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
३ जून, इ.स. १९८५ – ६ मार्च, इ.स. १९८६
पुढील:
शंकरराव चव्हाण

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Shivajirao Patil-Nilangekar : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन". Maharashtra Times. 2020-08-08 रोजी पाहिले.
  2. ^ Shivajirao Nilangekar Patil History