शिवणी बुद्रुक (लातूर)
शिवणी बु. हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेस वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावात गोदावरी नदीची उपनदी मांजरा व तावरजा या नद्यांचा संगम आहे.
?शिवणी बु. महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | लातूर |
लोकसंख्या | ५,६२५ (2001) |
सरपंच | वैशाली पवार |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• 413531 • +०२३८३ |
धार्मिक स्थळे
संपादनशिवणी बु. गावात महादेव मंदिर, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर अंबाबाई मंदिर, दर्गा ही काही मुख्य धार्मिकस्थळे आहेत.
परंपरा
संपादनशिवणी बु. गावात दरवर्षी खंडोबा मंदिर येथे यात्रा भरते.
शैक्षणिक स्थान
संपादनशिवणी बु. गावात एक जिल्हा परिषद शाळा आहे. त्याशिवाय या गावात बळीराजा शिक्षण संस्था कार्यरत आहे. बळीराजा शिक्षण संस्थेचे माध्यमिक शाळा व अध्यापक महाविद्यालय आहे.
उद्योग
संपादनगावात साईबाबा शुगर्स लि. हा साखर कारखाना आहे. गावापासून ५ कि.मी. अंतरावर आहे.
त्याशिवाय गावात विकासजी ही आय.टी. कंपनी आहे. कंपनी वेब डेव्हलपमेंट, वेब होस्टिंग, ग्राफिक डिझाईनिंग क्षेत्रात कार्यरत आहे.
आर्थिक
संपादनगावात साईबाबा बँक, बळीराजा पतसंस्था आहे.
बाह्य दुवे
संपादन- latur1.com लातूर विषयी माहिती देणारे संकेतस्थळ Archived 2012-03-30 at the Wayback Machine.
- VikasG Web Solutions Archived 2012-11-29 at the Wayback Machine.
राजकीय स्थान
संपादनराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री. बबन भोसले हे शिवणी बु. गावचे आहेत.