शिरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. माण व खटाव तालुक्याच्या सीमेवर माण च्या पश्चिम बाजूला डोंगरावर वसलेले गाव, जून-जुलै महिन्यात पावसानंतर मिनी-महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते, शिरवली मध्ये हनुमानाचे प्रसिद्ध असे मंदिर असून हनुमान जयंती पासून ९ दिवस हरिनाम सप्तहाः होत असतो, त्याला जोडूनच तरुण मुले क्रिकेट चे सामने भरवतात व लागूनच येत असलेली शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पाडतात. गोकुळाष्टमी च्या दिवशी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन हुलग्यांच्या आमटी व बाजरीची भाकरी चा भांडरा बनवतात, त्याचा लाभ घेण्यासाठी मलवडी पंचक्रोशी मधील सर्व गावांचे ग्रामस्थ शिरवलीला भेट देत असतात.

  ?शिरवली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर मलवडी-दहिवडी
जिल्हा सातारा जिल्हा
लोकसंख्या १,२०० (२०११)
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/११

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे संपादन

शिरवली गाव डोंगरावर वसलेले असल्याने जून-जुलै महिन्यात पावसानंतर या ठिकाणी मिनी-महाबळेश्वर चा फिल येत असतो, डोंगरावर वसलेल्या पवन चक्की व हिरवा गार निसर्ग अनुभवण्यासाठी शाळेच्या सहली या ठिकाणी येत असतात,

नागरी सुविधा संपादन

शिरवली मधील नागरिकांना दळण वळणाची सुविधा म्हणजे रस्ता च नसलेमुळे हव्या तश्या मिळत नाहित, शाळेतील बहुतेक मुले,मलवडी-दहिवडी ला असलेमुळे चालू बंद अवस्थेत ST बस ची सुविधा आहे, शिरवली-रणशिंग वाडी रस्ता दुरवस्था असलेमुळे पुसेगाव, बुध अथवा जिल्हा ठिकाणी जायचे असल्यास ग्रामस्थ मलवडी -कुलकजाई मार्गे 25 km चा वळसा घालून जातात, डिसेंबर नंतर पाण्याची चणचण भासू लागते, नागरिक पिण्यासाठी विकत पाणी घेतात, त्यामुळे शेतीला पुरेसे पाठबळ नाही, शिरवली मधील बहुतांश मुले ही आर्मी पोलीस अथवा तत्सम भरतीसाठी प्रयत्न करतात व त्यामध्ये सेवा करतात.

जवळपासची गावे संपादन

शिरवली हे माण तालुक्याची पश्चिम हद्द पूर्ण करते, शिरवलीच्या पश्चिमेकडे खटाव तालुक्याची हद्द सुरू होते, खटाव मधील रणशिंगवाडी, वेटने बुध ही गावे आहेत, तसेच वरील बाजूला डोंगरावर बोथे गाव वसलेले आहे, उत्तरेकडे कुलकजाई ,शिंदी भांडवली , व दक्षिणेकडे निढळ, कातळकेवाडी, पूर्वेकडे मलवडी, सत्रे वाडी नवलेवाडी ही गावे स्थित आहेत.

मात्र शिरवलीला जाण्यासाठी एकमात्र रस्ता मलवडी वरून आहे.

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate