शिरपूर तालुका
शिरपूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यातील एक तालुका आहे.
?शिरपूर तालुका धुळे • महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
मुख्यालय | शिरपूर शहर |
मोठे शहर | शिरपूर , थाळनेर, अर्थे खुर्द |
जवळचे शहर | धुळे |
विभाग | कान्हदेश |
जिल्हा | धुळे |
लोकसंख्या • शहर |
५,००,००० (जिल्ह्यात २रा) (२०२२) • २१% |
भाषा | मराठी |
आमदार विधानसभा | काशीराम पावरा, भाजप |
आमदार विधानपरिषद | अमरीश पटेल, भाजप |
संसदीय मतदारसंघ | नंदूरबार लोकसभा मतदार संघ |
जिल्हा | धुळे |
पंचायत समिती | पंचायत समिती शिरपूर |
अन्य प्रमूख शहरे | थाळनेर, सांगवी, अर्थे, दहिवद, बोराडी |
सर्वात मोठे शहर | शिरपूर शहर |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४२५४०५ • +०२५६३ • MH-18 |
स्थान
संपादनशिरपूर तालुका धुळे जिल्हयाच्या उत्तरेस असून धुळे शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. हा महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ४०० कि.मी. अंतरावर असून, समुद्रसपाटीपासून सुमारे १८० ते २१५ मीटर उंचीवर आहे. या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २३६५ किमी२ आहे..
भौगोलिक माहिती
संपादनयेथे सरासरी वार्षिक पाऊस ५८७ मि.मी. एवढा होतो. तसेच जमीन मध्यम प्रतीची आहे.
तापमान
संपादनयेथील हवामान कोरडे असून उन्हाळ्यात तापमान ४३ अंश सेल्शियस पर्यंत व हिवाळयात १० अंश सेल्शियस पर्यंत असते.
प्रमुख पिके
संपादनयेथील हवामान ऊस, केळी, बाजरी, ज्वारी, कापूस यांना उपयुक्त असे आहे.
जलसिंचन सुविधा
संपादनशिरपुर तालुक्यात अरुणावती नदीवर हाडाखेड धरण असून त्यातील पाणी शेतीसाठी कालव्याद्वारे दिले जाते. यामुळे तालुक्यातील बरीच शेती सिंचनाखाली येते.
प्राथमिक आरोग्यसुविधा
संपादनशिरपुर तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६ उपकेंद्रे आहेत. तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषद संचालित इंदीरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल मध्ये सर्व सोयीने सुसज्ज २०० बेडची सुविधा उपलब्ध आहेत. तसेच तालुक्यात पहिल्या श्रेणीचे गुरांचे एकूण १० दवाखाने असून दुसऱ्या श्रेणीची ४ पशुप्रथमोपचार केंद्रे आहेत.
शिक्षणसुविधा
संपादनशिरपुर तालुक्यात २६४ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत.शिरपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातून सर्व शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात
शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे.
गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत.
येथे कर्मवीर आण्णासाहेब व्यंकटराव तानाजी रणधीर यांची किसान विद्या प्रसारक संस्था आहे व आमरीश भाई पटेल यांची शिरपूर एज्युकेशन सोसायटी ही मह्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था आहेत.
औद्योगिक क्रांती
संपादनशिरपूर तालुक्यात एक साखर कारखाना व एक सूतगिरणी आहे.
शिरपूर गोल्ड रिफायनरी, सूतगिरणी, साखर कारखाना, कापड मिल, मधूर फुड पार्क व छोटे मोठे उद्योगधंदे आहेत.
आध्यात्मिक महत्त्व
संपादनमहाराष्ट्रातल्या खानदेशमधील धुळे जिल्हा हा श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे असे मानले जाते. जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई. रामायण, महाभारत, व सुदेशकुमार चरित्रामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंतर यादव काळात राजा सेऊणचंद्रच्या नंतर सेऊन देश या नावानेही तो ओळखला जाई. महाभारताच्या भीष्म पर्वात गोमता, मदंका, खर्डा, विदर्भ व रूपवाहिका असा विविध प्रदेशांचा उल्लेख आहे त्यांतील खर्डा म्हणजेच खानदेश, म्हणजे पूर्वीचा कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश. काहीच्या मते गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या तालुक्यातील थाळनेरचा दुसरा फारूखी राजा मलिक यांना खान ही पदवी बहाल केली होती, त्यावरून खानदेश हे नाव पडले. याच खानदेशमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर येते.
शिरपूर तालुक्याला शिरपूर हे नांव कसे पडले याची एक कथा सांगण्यात येते. फार पूर्वी काळूबाबा नावाचे सदगृहस्थ होते. श्री. खंडेराव महाराजांवर त्यांची श्रद्धा होती व ते नेहमी भगवंताची पूजाअर्चना, नामस्मरण, भक्ती यात मग्न असत. काळूबाबा सांसारिक गृहस्थ होते. त्यांची व्यथा म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वतःचे शिरकमल देण्याचा खंडेराव देवाला नवस केला व साकडे घातले. यानंतर नवसाप्रमाणे त्यांना मुलगा झाला. नवसानुसार श्री खंडेराव महाराजांच्या चरणी स्वतःचे शिरकमल अर्पण केले असता शिरकमळातून रक्त न निघता भंडारा (हळद) निघाला. त्यावरून या शहराचे नाव शिरपूर असे पडले असे जुने वयोवृद्ध लोक सांगतात.
वैशिष्ट्य
संपादनतालुक्यात एकूण १४७ गावे असून लोकसंख्या ३,३७,५५३ एवढी आहे. तालुक्यात एकूण ११८ ग्रामपंचायती आहेत.
शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिर असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते.
शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत.शिरपूर येथे भव्य मोठे बुद्ध विहीर आहे अतिशय सुंदर परिसरात बौद्ध बांधव धम्म देसना करतात .
तालुक्यातील शहरे
संपादन१. शिरपुर
शिरपुर शहर तालुक्याचे मुख्यालय आहे. शिरपूर शहराची लोकसंख्या १,००,००० आहे. शहर शिक्षण संकुल, उद्योग या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शिरपूर शहर धुळे जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. शिरपूर शहर अरूनावती च्या काठी वसलेले आहे. शहरात शिरपूर- वारवडे नगरपालिका व मांडल, अजंदे, शिंगावे, खार्दे बु., कलमसरा व अमोदे या सहा ग्रामपंचायती आहेत
२. थाळनेर
थाळनेर हे शिरपूर तालुक्यातील उपनगर आहे . शहर मध्ययुगीन काळात खानदेशची राजधानी होते. थाळनेरची लोकसंख्या १५,००० आहे. शहरात थाळनेर, वाठोडे व भाटपुर या ३ ग्रामपंचायती आहेत.
३. सांगवी
आदिवासी बहुल असलेले हे शहर धुळे - इंदौर व मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक३ वर वसलेले आहे , शहराची लोकसंख्या १२,००० आहे. शहरात सांगवी व नवी सांगवी या २ ग्रामपंचायत आहेत.
४. अर्थे
अर्थे हे शहर बुरहानपुर- अंकलेश्र्वर महामार्ग वर वसलेले आहे. अर्थे शहरातून रेती नदी वाहते. ती शहराला दोन भागात विभागते. शहरातील म्हाळसां मंदिर प्रसिद्ध आहे. शहरात अर्थे खुर्द व अर्थे बुद्रुक या २ ग्राम पंचायत आहेत . शहराची लोकसंख्या ११,००० आहे.
५. बोराडी
बोराड हे शहर अमळनेर - शाहदे महामार्गावर वसलेले आहे. बोराडी शहरातून अर्थे - बोराडी जील्हामार्ग जातो. शहर आदिवासी व मराठा बहुल आहे. शहरात अनेक शिक्षण संस्थान आहेत. शहरात बोराडी, न्यू बोरडी या दोन ग्राम पंचायत आहेत. शहराची लोकसंख्या १०,५०० आहे.
६. दहीवद
दहीवद हे शहर मुंबई- धुळे- इंदौर- आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक३ वर व बुऱ्हाणपूर- अंकलेश्र्वार महामार्गावर वसलेले आहे. शहरात अनेक उद्योग कारखाने, शिक्षण संकुल आहेत. शहरात शिरपूर विमानतळ आहे. दहीवद हे शहर दहीवड ही एक ग्राम पंचायतमध्ये येते. शहराची लोकसंख्या१०,००० आहे.
उल्लेखनीय
संपादनशिरपूर हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील हिचे जन्म गाव आहे.
शिरपूरपासून जवळच असलेले श्री क्षेत्र खर्दे बुद्रुक हे महानुभाव पंथीयांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथील दत्त मंदिर एक जागृत देवस्थान आहे. येथे मार्गशीर्ष महिन्यात येणारी यात्रा व आषाढी पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या देवपूजा व प्रसादवंदनाचा कार्यक्रम विशेष प्रसिद्ध आहे.
शेतीवर आधारित उद्योग जसे की रोप वाटिका व इतर अनेक उद्योग येथे आहेत. उंटावद येथील श्री कृष्णा ग्रीनहाऊस ही एक उत्तर महाराष्ट्रातील नावाजलेली नर्सरी (रोपवाटिका) येथे आहे.
तसेच शिरपूर तालुक्यातील गुगल नामांकन आठ प्राप्त उत्तर महाराष्ट्रातील एकमेव गुगल गाईड मनाेहर पांडुरंग वाघ यांचे जन्मस्थान आहे. मनोहर वाघ हे तंत्रस्नेही विषय साधनव्यक्ती आहेत यांनी अनेक स्थळे गुगल नकाशात जोडली आहेत त्या स्थळांना आजपर्यंत पंचवीस लाख लोकांनी भेटी दिल्या आहेत व त्यांचे यू ट्यूब चॅनल आहे.अधुनिक अध्यापन पद्धती वर ते शिक्षकांना मोफत मार्गदर्शन करतात व त्यांच्या सेमिनार ला आजपर्यंत बावीस हजार शिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनधुळे जिल्ह्यातील तालुके |
---|
धुळे तालुका | शिरपूर तालुका | साक्री तालुका | शिंदखेडा तालुका |