शिमसा धबधबा
शिमसा धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील धबधबा आहे. शिमसा नदीवरील हा धबधबा मंड्या जिल्ह्यात असून येथेच शिमसा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाची क्षमता १७.२ मेगावॅट आहे. १९०२पासून येथील वीज जवळच्या कोलार सोनखाणींना पुरवली जाते. या प्रकल्पाची कोनशिला मैसूरच्या राजा कृष्णराज वूडियार चौथ्याने बसवली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |