शालिनी पाटील

भारतीय राजकारणी
(शालिनीताई पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. शालिनी वसंतदादा पाटील ह्या एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री आहेत. त्या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केलेल्या मानते जाते. जिजाबाई भोसले यांच्यावर सर्वप्रथम पहिला चरित्र ग्रंथ लिहणाऱ्या लेखिका शालिनीताई पाटील आहेत.

त्या वसंतदादाच्या दुसऱ्या पत्नी होत्या, त्यांचा प्रथम विवाह एक न्यायाधीशासोबत झाला होता मात्र ते लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याचे निधन झाले. पाटील ह्या बॅरिस्टर व कायदा निष्णात होत्या. पुढे त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी लागली, पुढे त्या मुख्यमंञी वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंतदादा व शालिनी यांनी विधवा पुर्नविवाह मोहिम त्या काळात राबवत त्यांनी कायद्याने विवाह केला. पाटील पुढे मुख्यमंञी ए.आर. अंतुलेंच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या. त्यांनी क्रांतीसेना पक्ष काढला होता.[ संदर्भ हवा ]