शार्दूलविक्रीडित (वृत्त)
एक अक्षरगण वृत्त
शार्दूलविक्रीडित हे एक अक्षरगणवृत्त आहे. ह्या वृत्ताच्या प्रत्येक चरणात १९ अक्षरे येतात. यति बाराव्या अक्षरावर येतो. ह्या वृत्ताचे गण म-स-ज-स-त-त-ग असे येतात. महाराष्ट्रातील हिंदुधर्मीयांच्या विवाहांत म्हणण्यात येणारी मंगलाष्टके ही शार्दूलविक्रीडित वृत्तात असतात.
शार्दूलविक्रिडिताचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :
म | स | ज | स | त | त | ग |
---|---|---|---|---|---|---|
गा गा गा | ल ल गा | ल गा ल | ल ल गा | गा गा ल | गा गा ल | गा |
२ २ २ | १ १ २ | १ १ २ | १ १ २ | २ २ १ | २ २ १ | २ |
उदाहरणे
संपादन- आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके।
देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया।
विश्वी या प्रतिभाबले विचरितो चोहीकडे लीलया।
दिक्कालातुन आरपार अमुची दृष्टी पाहाया शके।।
- आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूलविक्रीडित ।
मा सा जासत ता ग येति गण हे पादास की जोडित।।
- मासाजा सतताग येति गण ते शार्दूलविक्रीडिती।
- मानावा समरा जनास समरा ताराप ताराप गा।
- म्हातारी उडता न येचि तिजला माता मदीया अशी।
कांता काय वदो नवप्रसव ते साता दिसांची तशी॥
हेसुद्धा पाहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- कांतेस-भास्कर रामचंद्र तांबे विदागारातील आवृत्ती
- असा मी असामी- भूषण कटककर Archived 2016-03-04 at the Wayback Machine.
- आम्ही कोण?-कृष्णाजी केशव दामले|केशवसुत Archived 2009-09-06 at the Wayback Machine.