मंदाक्रांता (वृत्त)
एक अक्षरगण वृत्त
(मंदाक्रांता या पानावरून पुनर्निर्देशित)
मंदाक्रांता हे कवितेस चाल देण्याचे एक अक्षरगणवृत्त आहे. ह्या वृत्ताची गण रचना "म-भ-न-त-त-ग-ग" अशी आहे.
मंदाक्रांताचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :
म | भ | न | त | त | ग ग |
---|---|---|---|---|---|
गा गा गा | गा ल ल | ल ल ल | गा गा ल | गा गा ल | गा गा |
२ २ २ | २ १ १ | १ १ १ | २ २ १ | २ २ १ | २ २ |
उदाहरणे
संपादन- मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढ मासी,
होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी,
त:निश्वास श्रवुनि रिझवी कोण त्याच्या जिवासी,
मंदाक्रांता सरल कविता कालिदासी विलासी.
--(माधव ज्युलियन)
- मंदाक्रांता म्हणति तिजला वृत्त हे मंद चाले |
ज्याच्या पादी मभनतत हे आणि गा दोन आले ||
- मंदाक्रांता म्हणति तिजला माभनातातगागा |
संस्कृत उदाहरण:
संपादन- कश्चित्कांता विरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः |
- शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् |