वोल्खोव (रशियन: Во́лхов) ही वायव्य रशियामधील एक नदी आहे. वोल्खोव नदी रशियाच्या इल्मेन सरोवराला लदोगा सरोवरासोबत जोडते. एकूण २२४ किमी लांबी असलेली वोल्खोव रशियाच्या नॉवगोरोदलेनिनग्राद ह्या ओब्लास्तांमधून वाहते.

वोल्खोव नदी
Во́лхов
Vel Nov Volkhov.JPG
वेलिकी नॉवगोरोद शहरामधील वोल्खोवचे पात्र
Volkhov-Ilmen eng.png
वोल्खोव नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम इल्मेन सरोवर
मुख लदोगा सरोवर
पाणलोट क्षेत्रामधील देश रशिया ध्वज रशिया
लांबी २२४ किमी (१३९ मैल)
उगम स्थान उंची १८ मी (५९ फूट)
सरासरी प्रवाह ५८० घन मी/से (२०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ८०,२००

वेलिकी नॉवगोरोद हे वोल्खोव नदीच्या काठावर वसलेले प्रमुख शहर आहे.