वै वै (सोपी चिनी लिपी: 魏巍; पिन्यिन: Wèi Wéi) अथवा होंग ज्ये (सोपी चिनी लिपी: 鸿杰; पारंपरिक चिनी लिपी: 鴻傑; पिन्यिन: Hóng Jié) (जानेवारी १६, १९२० - ऑगस्ट २४, २००८) हा चिनी कवी, लेखक, पत्रकार, चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील बऱ्याच वृत्तपत्रांचा मुख्य संपादक व साम्यवादी राजवटीचा प्रचारक होता. देशभक्ती, साम्यवादराष्ट्रवाद या संकल्पनांवर बेतलेल्या साहित्यकृतींसाठी तो विशेष ओळखला जातो.

वै वै
जन्म नाव होंग ज्ये
टोपणनाव वै वै
जन्म जानेवारी १६, १९२०
चेंग्चौ, हनान, चीन
मृत्यू ऑगस्ट २४, २००८
बैजिंग, चीन
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा चिनी
साहित्य प्रकार कविता, कादंबरी, नियतकालिक
चळवळ चिनी साम्यवाद