वेल्डिंग ही धातू किंवा थर्मोप्लास्टिक जोडण्याची प्रक्रिया आहे. यात खूप उष्णता वापरून भाग वितळतात एकमेकांना जोडतात आणि त्यांना थंड होऊ देतात. वेल्डिंग हे कमी तापमानात धातू जोडण्याच्या तंत्रापेक्षा वेगळे आहे. कमी तापमानात धातू जोडण्याला ब्रेझिंग आणि सोल्डरिंग म्हणतात. यात मूळ धातू वितळवला जात नाही.

पाईपवर गॅस मेटल आर्क वेल्डिंग (जीएमएडब्ल्यू वेल्डिंग).


फिलर मटेरियल बेस मेटल वितळण्यासाठी वापरतात. फिलर मटेरियल स्वतः वितळुन एक तलाव होतो आणि वितळलेल्या बेस धातुशी जुडतो. हे सर्व थंड झाल्यावर जो पदार्थ तयार होतो तो कधी कधी मुळ धातुपेक्षाही अधिक मजबुत असू शकतो. वेल्ड तयार करण्यासाठी दबाव आणि उष्णता दोन्हीही वापरले जाऊ शकतात. वेल्डिंग करताना मुळ धातू किंवा वितळलेल्या धातूंना दूषित होण्यापासून किंवा ऑक्सिडायझेशन होण्यापासून वाचवण्यासाठी काही वेळेस संरक्षण कवचाची देखील आवश्यक भासते.

वेल्डिंगसाठी भिन्न भिन्न उर्जा स्त्रोतांचा वापर केला जाऊ शकतो. उदा, गॅस फ्लेम (केमिकल), इलेक्ट्रिक आर्क (इलेक्ट्रिकल), लेसर, इलेक्ट्रॉन बीम, घर्षण आणि अल्ट्रासाऊंड . औद्योगिक प्रक्रिया होत असतानाही वेल्डिंग खुल्या हवेत, पाण्याखाली आणि बाहेरील जागेत बऱ्याच वेगवेगळ्या वातावरणात केले जाऊ शकते. वेल्डिंग ही एक धोकादायक प्रक्रिया आहे. यात जळणे, विजेचा शॉक लागणे, दृष्टीला नुकसान होणे, विषारी वायू श्वासावाटे फुत्फुसात जाणे आणि तीव्र अल्ट्राव्हायोलेट किरणोत्सर्गाचा धोका असे धोकादायक प्रकार होऊ शकतात. वेल्डिंग करताना या प्रकारच्या धोक्यांपासून वाचण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असते.

१९ व्या शतकाच्या शेवटापर्यंत, केवळ फोर्ज वेल्डिंग हीच वेल्डिंग प्रक्रिया माहिती होती. या पद्धतीत लोहार लोह आणि स्टील एकत्र करण्यासाठी हे गरम करून आणि हातोडा मारत असे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित होणाऱ्या पहिल्या प्रक्रियांमध्ये आर्क वेल्डिंग आणि ऑक्सी-फ्यूल वेल्डिंग ही होती. त्यानंतर लवकरच इलेक्ट्रिक रेझिस्टन्स वेल्डिंगचा शोध लागला. २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात वेल्डिंग तंत्रज्ञान लवकर प्रगत झाले कारण जागतिक युद्धांनी विश्वासार्ह आणि स्वस्त खर्चात धातु एकत्र होण्याची गरज वाढवली होती. युद्धांनंतर वेल्डिंगची अनेक आधुनिक तंत्रे विकसित केली गेली. शील्डल्ड मेटल आर्क वेल्डिंगसारख्या मॅन्युअल पद्धती विकसित केली. सध्याची सर्वात लोकप्रिय वेल्डिंगच्या पद्धतींपैकी ही एक आहे. तसेच गॅस मेटल आर्क वेल्डिंग, बुडलेल्या चाप वेल्डिंग, फ्लक्स-कोरड आर्क वेल्डिंग आणि इलेक्ट्रोस्लाग वेल्डिंग यासारख्या सेमी-स्वयंचलित आणि स्वयंचलित वेल्डिंगच्या पद्धतींचा शोध लावला. शतकाच्या उत्तरार्धात लेसर बीम वेल्डिंग, इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंग, चुंबकीय नाडी वेल्डिंग आणि घर्षण वेल्डिंगच्या अविष्काराने विकास चालूच राहिला. आजही विज्ञान सतत प्रगती करतच आहे. औद्योगिक कंपन्यांमध्ये रोबोट वेल्डिंग ही सामान्य गोष्ट आहे आणि संशोधकांनी नवीन वेल्डिंग पद्धती विकसित करणे आणि वेल्डच्या गुणवत्तेचे अधिक ज्ञान घेणे सुरूच ठेवले आहे.

व्युत्पत्तिशास्त्र संपादन

"वेल्ड" हा शब्द मूळचा इंग्रजी आहे आणि याचे मूळ स्कॅन्डिनेव्हियापासून आहे. हा शब्द बऱ्याचदा जुन्या इंग्रजी शब्द विल्ड(weald), ज्याचा अर्थ "जंगलाचे क्षेत्र" आहे, चुकीने जोडला जातो. कालांतराने हा शब्द "वाईल्ड" (wild) या शब्दात बदलला. वेल्डिंग साठीचा जुना इंग्रजी शब्द समोड (samod), एकत्र आणण्यासाठी, हा होता. [१]

संदर्भ संपादन

  1. ^ A Concise Anglo-Saxon Dictionary by John R. Clark Hall, Herbert T. Merritt, Herbert Dean Meritt, Medieval Academy of America -- Cambridge University Press 1960 Page 289