वेजेगाव
वेजेगाव हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील गाव आहे.
?वेजेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | खानापूर (विटा) |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
वेजेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==लोकजीवन==. वेजेगाव हे दुकानदार लोकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. गावात शिक्षणाची उत्तम सोय आहे. जिल्हा परिषदेची चवथी पर्यंत ची शाळा आहे. रयत शिक्षण संस्थेचे दाजी पाटलोजी विद्यालय आणि श्रीरंग दाजी देवकर जुनियर कॉलेज मध्ये बारावी पर्यंत च्या शिक्षणाची सोय आहे. गावात पशू वैद्यकीय दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. गावात संपूर्ण मार्बल मध्ये बांधलेले शिव मंदिर आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेचे टप्पा क्रमांक चार चे पंप हाऊस याच गावात आहे.
==प्रेक्षणीय स्थळे== गावाजवळ दावल मलिक हे डोंगरावर असलेले देवस्थान असून हिंदू मुस्लिम लोक याचे भक्त आहेत. गावात शिवमंदिर, रेणुका मंदिर ही पाहण्यासारखी ठिकाणे आहेत
==नागरी सुविधा== प्राथमिक आरोग्य केंद्र , पशू वैद्यकीय दवाखाना, जुनियर कॉलेज इत्यादी नागरी सुविधा या गावात आहेत. लोक वर्गणी तून या गावात १९६३ सालात रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय बांधण्यात आले. नामदेव हरी देवकर आणि दत्तू हरी देवकर यांनी मराठी शाळेसाठी जमीन दिली.