वेंकट रेड्डी
वेंकटेश्वर के. रेड्डी (१९६५:मदनापल्ली, आंध्र प्रदेश, भारत - ) हे भारतीय-अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ आहेत. हे युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. अमेरिकेतील माउंटन-वेस्ट प्रदेशातील विद्यापीठांमध्ये हे भारतीय वंशाचे पहिले कुलगुरू आहेत.
शिक्षण
संपादनरेड्डी यांनी आंध्र प्रदेश शेतकी विद्यापीठातून पदवी घेतली. उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील पेन स्टेट युनिव्हर्सिटी येथे प्रवेश मिळविला. विद्यापीठाने आर्थिक मदत देऊ केल्याने ते अमेरिकेस जाऊ शकले. पेन स्टेटमधून त्यांनी शेतकी अर्थशास्त्रात एम.एस.ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तेथेच व्यवसाय व्यवस्थापनामध्ये विद्यावाचस्पतीची पदवी घेतली.
कारकीर्द
संपादनरेड्डी १९८९मध्ये कॉलोराडो स्प्रिंग्ज येथे आले व त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो ॲट कॉलोराडो स्प्रिंग्ज या विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राच्या अध्यापकाची नोकरी घेतली. १९९९मध्ये विद्यापीठातील व्यवसाय विद्यालयाचे डीन झाले आणि २०१३मध्ये त्यांना ऑनलाइन प्रोग्रॅमचे असोसिएट व्हाइस चान्सेलर केले गेले. २०१७मध्ये तेव्हाच कुलगुरू पॅम शॉकली-झॅलाबाक यांनी निवृत्ती घेतल्यावर रेड्डी यांना तात्पुरते कुलगुरुपदी नेमले गेले.[१] देशभरात शोध घेतल्यानंतर मे २०१७मध्ये रेड्डी यांची विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक झाली.[२]
- ^ http://gazette.com/editorial-new-uccs-chancellor-venkat-reddy-a-perfect-choice/article/1602713
- ^ "संग्रहित प्रत". 2017-06-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-02-22 रोजी पाहिले.