विष्णुपंत औंधकर

(विष्णू हरी औंधकर या पानावरून पुनर्निर्देशित)

विष्णूपंत हरी औंधकर (३ डिसेंबर, इ.स. १८८२ - १७ डिसेंबर, इ.स. १९४२) हे एक स्त्रीपार्टी मराठी नट आणि नाटककार होते. त्यांनी आग्ऱ्याहून सुटका, बेबंदशाही आणि महारथी कर्ण ही नाटके लिहिली.

औंधकरांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव) संपादन

  • आशीर्वाद
  • करीन ती पूर्व (बाजीप्रभू}
  • तोतयाचे बंड (विठाई)
  • पुण्यप्रभाव (कालिंदी)
  • प्रेमसंन्यास (सुशीला)
  • बेबंदशाही (येसूबाई)
  • मत्स्यगंधा (ललिता)
  • महारथी कर्ण (कृष्ण)
  • मायेचा पूल (राधा)
  • वधूपरीक्षा (वाराणसी)
  • विचित्रलीला (तुळशी)
  • शिवसंभव (जिजाऊ)

पुरस्कार, सुवर्णपदक, सन्मान वगैरे संपादन

  • दि. १२ एप्रिल १९४४ रोजी मुंबई साहित्य संघाने आपला भव्य नाट्योत्सव साजरा केला. या नाट्योत्सवात नाट्यरसिकांचे विराट दर्शन झाले आणि मराठी रंगभूमीला नवसंजीवनी मिळाली. या नाट्यमहोत्सवात झालेल्या ‘शारदा’ नाटकाच्या प्रयोगाला प्रकाश पिक्चर्सचे विष्णूपंत औंधकर सुवर्णपदक मिळाले.
  • बार्शीतील नाट्यगृहाला ’औंधकर नाट्यगृह’ हे नाव देण्यात आलेले आहे. (हे नाट्यगृह बहुधा बंद पडले असावे.)