विष्णू श्रीधर जोशी

भारतीय इतिहास संशोधक, लेखक

विष्णू श्रीधर जोशी (जन्म २० ऑगस्ट १९१९[] मृत्यू २५ एप्रिल २००१[]) हे मराठी लेखक आणि इतिहाससंशोधक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्‍नांच्या इतिहासाविषयी आणि सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी त्यांनी संशोधनपूर्वक लेखन केले आहे.

विष्णू श्रीधर जोशी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहाससंशोधन, साहित्य
भाषा मराठी
प्रसिद्ध साहित्यकृती मृत्युंजयाचा आत्मयज्ञ, कंठस्नान आणि बलिदान, क्रांतिकल्लोळ

चरित्र

संपादन

वि. श्री. जोशी ह्यांचा जन्म ठाणे येथे झाला. ठाणे येथील महानगरपालिका मराठी शाळा क्र. १ तसेच बी. जे. हायस्कूल ह्या शाळांत त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुणे येथील स. प. महाविद्यालयातून त्यांना १९४०मध्ये बी. ए. ही पदवी संपादन केली. पदवी मिळवण्याआधीपासून ते मुंबई महापालिकेच्या लेखाविभागात नोकरीला लागले. महापालिकेत चौकशी अधिकारी म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. १९७६ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली.[] त्यानंतर १९९५पर्यंत त्यांनी सशस्त्र क्रांतिलढ्याविषयी संशोधन आणि लेखन केले. त्यानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांचे संशोधनाचे काम थांबले तरी त्यांना शेवटपर्यंत क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयी आस्था होती.[]

१९३९ साली वि.श्री. ह्यांची शोभा ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. मात्र ती राजकीयदृष्ट्या आक्षेपार्ह असल्याने तत्कालीन शासनाने त्या कादंबरीवर बंदी घातली. ही बंदी १९४६ ह्या वर्षी उठवण्यात आली.

१९४७ साली वि.श्री. ह्यांनी वासुदेव बळवंत फडके ह्यांचे चरित्र लिहून प्रकाशित केले. तसेच स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या चरित्रांविषयीचे मृत्युंजयाचा आत्मयज्ञ हे पुस्तक १९५१ ह्या वर्षी प्रकाशित झाले. ह्या पुस्तकांचा उल्लेख ५१व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती दुर्गा भागवत ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला होता.[]

ग्रंथसंपदा

संपादन
  • अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • अग्निपथावरील परागंदा (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (चरित्र)
  • ज्वालामुखीचे अग्निनृत्य (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • झुंज सावरकरांची (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • २०२ साहसकथा (बालवाङ्‌मय, मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • पूर्णाहुति आणि वाताहत (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • प्रलयातील पिंपळपाने , प्रका- अ.र.फडके, मनोरमा प्रकाशन, मुंबई-१४, मु- माधुरी मुद्रण, पुणे-५, जानेवारी १९९०, पाने-४१४.
  • मृत्युंजयांचा आत्मयज्ञ (सशस्त्र क्रांतिकारकांची चरित्रवजा कादंबरी), प्रका- र.वि.रघुवंशी, श्रीगजानन बुक डेपो, मुंबई-२८, मु- य.गो.जोशी,आनंज मुद्रणालय, पुणे-३०, डिसें १९५१, पाने-४४०.
  • वडवानल (भगतसिंग, चंद्रशेखर आझाद आदींवर चरित्रवजा कादंबरी), प्रका- वि.श्री.जोशी, मुंबई-२८, मु- रविराज प्रिंटरी, पुणे-२, १९७८, पाने-४३१.
  • वणवा : हिंद देशीचा (मनोरमा प्रकाशन, पुणे)
  • शृंखला खळाखळा तुटल्या ( नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील चरित्रवजा कादंबरी), प्रका- अ.र.फडके, मनोरमा प्रकाशन, मुंबई-१४, मु- माधुरी मुद्रण, पुणे-५, पाने-५८८.
  • कंठस्नान आणि बलिदान ( क्रांतिकारक चापेकर बंधू आणि रानडे यांचा रोमहर्षक जीवनवृतान्त), प्रका- शां शि. सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई-२८, मु- चिं.वा.जोशी, माधव प्रिंटिग प्रेस, अलिबाग, पाने-३७६.
  • *शोभा* (कादंबरी)
  • "'पहाटेचे चांदणे"' (कादंबरी)
  • "'मंगला"' (कादंबरी)
  • "'क्रांतिकल्लोळ- मनोरमा प्रकाशन"' (सावरकरांची जीवनगाथा)

संदर्भ

संपादन
  1. ^ a b लेखकाविषयी -; समाविष्ट : जोशी, वि. श्री.; पूर्णाहुति आणि वाताहात; १९९५; मनोरमा प्रकाशन; पुणे; प्रारंभिक पृष्ठे ४-५ (सदर आवृत्तीच्या प्रतीत प्रारंभिक १४ पृष्ठे व त्यानंतरची ८ चित्रपृष्ठे ह्यांवर क्रमांक छापलेले नाहीत.)
  2. ^ a b c मृत्युंजयांचा आत्मयज्ञ ह्या पुस्तकाच्या राजा प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या आवृत्तीतील माधुरी चंद्रशेखर जोशी ह्यांचे मनोगत (पृ. दहा) सदर पुस्तकाची नमुनापाने बुकगंगा ह्या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०१७ रोजी २३:१८ वाजता पाहिली त्यानुसार