विष्णुकवी

विष्णुदास या नावाने रेणुकादेवीची पदे लिहिली आहेत
(विष्णूकवी या पानावरून पुनर्निर्देशित)

विष्णूकवी किंवा विष्णूदास(१८४४ सातारा-मृत्यू:सन १९१७ (१९१८?)) हे एक रेणुकादेवीचे भक्त होते. त्यांचे पूर्ण नाव श्रीकृष्ण श्रीधर (रावजी) धांधरफळे असे होते. धांधरफळ हे संगमनेर तालुक्यातील व अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव आहे. परंतु, त्यांचे पूर्वज साताऱ्याला स्थायिक झाले होते.[]

इतिहास

संपादन

त्यांची मौंज त्यांचे वयाचे सातव्या वर्षी करण्यात आली.त्यांचे लग्न १२व्या वर्षीच झाले. त्यांच्या पत्नीचे नाव राधाबाई असे होते. त्यांना अठराव्या वर्षी विरक्ती आली. ते नंतर कर्नाटकातील हंपी येथे शंकराचार्यांच्या मठात सुमारे वर्षभर होते. नंतर त्यांनी बासर येथे राहून सरस्वतीची उपासना केली. ते शके १८८६मध्ये माहूरयेथे वास्तव्यास आले.[]

माहूर येथील मातृतीर्थाजवळ डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी तपश्चर्या केली.

त्यांनी रेणुकामातेच्या स्तुतिपर अनेक अभंग, काव्ये, भजने रचल्या. तसेच लावण्या व एक नाटकदेखील रचले. ते सन १९१७ मध्ये पौष शुद्ध अष्टमीला वयाचे ७३वे वर्षी निधन पावले.[]

सन १९१८ मध्ये ते समाधिस्थ झाले.(?)[ संदर्भ हवा ]}

संदर्भ

संपादन
  1. ^ a b c मो.बा.चरेगांवकर. तरुण भारत ई-पेपर, मुख्य, पान क्र. ८,'मोक्षार्थ' - "संतकवी श्री विष्णुदास महाराज (माहूर)" Check |दुवा= value (सहाय्य). २९-१२-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]