विश्व बंजारा दिवस हा वैभवशाली आणि स्वतंत्र संस्कृती असणाऱ्या बंजारा समाजाचे स्वाभिमान , संघर्ष आणि सहिष्णुतेचा परिचय करून देणारा हा महत्वपूर्ण दिवस आहे. हा दिवस 8 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा केला जातो.

काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत बंजारा समाज व्यास्तव्यास असून भारताबाहेरील युरोपियन देशातील विविध प्रदेशात ही वास्तव्यास आहे. जगाच्या पाठीवर कोणत्याही प्रदेशातला बंजारा हा आजही आपली स्वतंत्र आणि वैभवशाली संस्कृती जोपासतांना आढळून येतो. राजा लखीराय बंजारा (लखीशाह बंजारा) हे शूरवीर योद्धा त्याचबरोबर लाखो लोकांचा कल्याण करणारा राजा म्हणून प्रचलित आहे. त्यांचा त्याकाळी लाखाच व्यापार हा भारतासह युरोपियन देशापर्यंत चालत असे. पाश्चात्य युरोपियन संस्कृती आणि भारतीय विविधतापुर्ण संस्कृतीचे आदानप्रदान करून वैश्विक संस्कृतीला समृद्ध करण्यात शिवाय सांस्कृतिक जडणघडणीमध्ये लखीराय बंजारा यांचे मोलाचे योगदान मानले जाते. विश्व बंजारा दिवस याला युरोपात रोमा बंजारा डे असेही म्हणतात.