लखीशाह बंजारा हे इतिहासातील गौरवशाली परंपरेचे एक वीर पराक्रमी योद्धा, जननायक , महाबलीदानी म्हणून ओळखल्या जातात. आशिया खंडातील सर्वात मोठे व्यापारी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे.[१] लाखा बंजारा हे लाखो लोकांचे लोककल्याणकारी राजा होते.म्हणून त्यांना 'लखीराय', 'लखीशाह' म्हणून संबोधले जाते. 'शाह' किंवा 'राय' याचा अर्थ राजा म्हणून होतो. त्यामुळेच लाखा बंजारा हे लखीशाह बंजारा या नावानेच इतिहासात प्रचलित आहे. आशिया खंडाचा राजा म्हणून ओळख आहे.त्यांचा जन्म 4 जुलै 1580 मध्ये झाला. दिल्ली स्थित रायसिना नगरीचे ते नायक होते. रायसिना, मालचा, धोलकुंवा, बारखंबा हे क्षेत्र राजा लखीराय बंजारा यांच्या स्वाधिन होते. गौरराजवंशी बंजारा आणि विशेषतः शिख इतिहासात लखीराय बंजारा यांचा राष्ट्रभिमानी पराक्रम, राष्ट्र बांधणीसाठी दिलेले क्रांतिकारी योगदान शिवाय आपल्या संपूर्ण कुटुंबाचे दिलेले बलिदान याचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख आढळून येतो.[२] लाल किल्ला निर्मितीमध्ये त्यांनी योगदान दिले. शिवाय जगातील सर्वात मोठा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या'लोहगड' किल्ल्याची निर्मिती ही लखीराय बंजारा यांच्या राष्ट्रभक्ती व दानशुरतेचा परिचय करून देतो.[३][४]

संदर्भ संपादन

  1. ^ पवार, जयराम सिताराम (2019). लोहगढ. दिल्ली: ब्ल्यू रोज पब्लिकेशन. ISBN 978-93-5347-130-9.
  2. ^ सिंग, गगनदीप (2018). "Untold History of Lakhi Rai Banjara". हुंमाळो नगारारो. 1: 97–106.
  3. ^ Maharashtra, Max (2019-06-15). "लोहगढ; त्याग, शौर्य आणि बलिदानाचं सुवर्ण पान - रवी चव्हाण". www.maxmaharashtra.com. 2023-04-16 रोजी पाहिले.
  4. ^ राठौड, हरिसिंग (जानेवारी २०२३). हम बंजारे. मुंबई: ओंकार प्रिंट्स. pp. २१.