विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (नागपूर)
अभियांत्रिकी विद्यापीठ, नागपूर, भारत
(विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था या पानावरून पुनर्निर्देशित)
विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (लघुनाव: व्हीएनआयटी; पूर्वीचे नाव: विश्वेश्वरय्या रीजनल कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग) ही नागपूर स्थित तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी एक संस्था आहे. मूळरित्या ही संस्था सन १९६० मध्ये स्थापन झाली नंतर या संस्थेस मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांचे सन्मानाप्रित्यर्थ त्यांचे नाव देण्यात आले. ही भारतामधील ३१ स्वायत्त राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे.
VNIT | |
ब्रीदवाक्य | योगः कर्मसु कौशलम् |
---|---|
Type | सार्वजनिक तांत्रिक संस्था |
स्थापना | 1960 |
संकेतस्थळ | https://www.vnit.ac.in/ |
या संस्थेचा परिसर, नागपूरच्या पश्चिमेस असलेल्या अंबाझरी तलावाजवळ आहे. याचा विस्तार सुमारे २२० एकर आहे. या संस्थेच्या परिसरास तीन प्रवेशद्वार आहेत.