"कुष्ठरोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-अॅ +ॲ)
ओळ २३:
==निदान==
कुष्ठ रोगाचे जिवाणू असिड फास्ट बॅसिलस त्वचा, नाकातील स्त्राव, किंवा उतींच्या स्त्रावामध्ये रंजक पट्टी चाचणीमध्ये दिसतात. एल एल जिवाणू सहज चाचणीमध्ये दिसतात. पण टीटी जिवाणूंची संख्या अत्यंत कमी असते. ते सहजासहजी ओळखता येत नाहीत. अशा वेळी वैद्यकीय लक्षणावरून निदान करावे लागते. त्वचेवरील चट्ट्यांची स्थिति आणि रुग्णाचा कुष्ठरोग प्रवण भागात असलेला सहवास याची खात्री करून घेतात.
'''कुष्ठरोगाची लक्षणे''' आरोग्य कर्मचा-याना थोड्या दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सहज ओळखता येतात. अगदी थोड्या रुग्णाना प्रयोगशाळेत निदान करून घ्यावे लागते. कुष्टरोग प्रवण भागामध्ये अॅेसिडॲेसिड फास्ट बॅसिलस काचपट्टी परीक्षण, त्वचेवरील चट्टे , चट्ट्याच्या मध्यभागी असलेला फिकट रंग आणि चट्ट्याची संवेदन हीनता हे लक्षण मानण्यात येते. जाड झालेल्या चेता आणि स्नायू दौर्बल्य हे कुष्ठरोगाचे नेमके लक्षण असते. कुष्ठरोग्याना खाली सोडलेले पाऊल वर उचलता येत नाही तसेच चालण्यात दोष उत्पन्न होतो.
 
==उपचार==
सर्वात प्रचलित कुष्ठरोगावरील उपचारामध्ये डॅप्सोन हे औषध दिले जाते. जेंव्हा हे औषध नव्याने वापरात आले त्या वेळी त्याची परिणामकता उत्तम होती. पण काहीं वर्षामध्ये डॅप्सोन प्रतिकार जिवाणू आढळल्यानंतर बहु उपचार पद्धती वापरण्यात येऊ लागली. या उपचार पद्धतीचे लघुरूप एमडीटी (मल्टि ड्र्ग थेरपी) असे आहे. एमडीटी मध्ये डॅप्सोन, रिफांपिन (रिफंमिसिन) आणि क्लोफॅझिमिन (लॅम्प्रीन) या तीन जिवाणूप्रतिबंधक औषधांचा उपयोग करण्यात येतो. एमबी कुष्ठरोगावर तीनही औषधे देण्यात येतात. पीबी कुष्ठरोगावर मात्र फक्त रिफांपिन आणी डॅप्सोनचा वापर करण्यात येतो. तीन महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णाचा संसर्ग कमी व्हायला लागतो. उपचार चालू करण्याआधी बरेच रुग्ण संसर्गजन्य असत नाहीत. कुष्ठरोगाच्या प्रकारानुसार सहा महिने ते दोन वर्षे कुष्ठरोगावर उपचार घ्यावे लागतात.
कुष्ठरोगाच्या दोन्ही औषधांचा थोडा पार्श्व परिणाम होतो. डप्सोनमुळे मळमळ, गुंगी,हृदयगति वृद्धि, कावीळ आणि अंगावर पुरळ येऊ शकतात. पुरळ आल्यास त्वरिय वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॅप्सोनची रिफांपिन बरोबर आंतरक्रिया होते. रिफाम्पिन डॅपसोनच्या शरीरातील चयापचयाचा वेग वाढवते. त्यामुळे डॅपसोनचा डोस अॅयडजेस्टॲयडजेस्ट करावा लागतो. रिफांपिन मुळे स्नायूदुखी आणि मळमळ सुरू होते. कावीळ किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तिसरे औषध क्लोफॅझिमिन मुळे पोटात तीव्र वेदना आणि अतिसार होतो. कधी कधी त्वचेचा रंग बदलतो. तांबडा ते काळसर बदललेला त्वचेचा रंग पूर्ववत होण्यास औषध बंदा केल्यानंतर बरीच वर्षेलागतात. थॅलिडोमाइड नावाचे जन्मजात दोष उत्पन्न होण्याबद्दलचे कुप्रसिद्ध औषध सध्या कुष्ठरोगाची गुंतागुंत कमी करते. थॅलिडोमाइड शरीरातील ट्यूमर विघटन यंत्रणा नियंत्रित करते.
कुष्ठरोगाच्या रुग्णाना उपचार चालू असता गंभीर प्रतिकार यंत्रणा होण्यास तोंड ध्यावे लागते. याला लेप्रि रिअॅरिॲ.क्शन असे म्हणतात. प्रतिजैविकामुळे एम लेप्रि जिवाणूच्या पेशीपटलावरील प्रथिनामुळे शरीराची प्रतिकार यंत्रणा कार्यांवित होते. काहीं व्यक्तीमध्ये प्रतिपिंड आणि एम लेप्रि च्या प्रतिजनाबरोबर एकत्र येतात त्यामुळे त्वचेवर नव्याने चट्टे येणे आणि चेता तंतूंची टोके नष्ट होणे असे होऊ शकते. या प्रकारास इरिथेमा नोडोसम लेप्रोसम म्हणतात. कॉर्टिसोन औषधांचा वापरआणि थॅलिडोमाइड चा वापर केल्यास लेप्रा रिअॅेक्शनरिॲेक्शन आटोक्यात येते. काहीं रुग्णामध्ये उअपचारादरम्यान झालेले तीव्र आंत्र व्रण त्वचा रोपणाने बरे होतात.
 
==पूर्वानुमान==
"https://mr.wikipedia.org/wiki/कुष्ठरोग" पासून हुडकले