"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७:
 
===सद्‌‌गुरू===
अक्कलकोटचे [[श्री स्वामी समर्थ]] हे गजानन महाराजांचे सद्‌गुरू होते{{संदर्भ हवा}}. ह्या संदर्भात असे सांगितले जाते की ज्या दिवशी तरूण वयातील गजानन महाराज श्री स्वामींना भेटण्यास अक्कलकोटला येणार होते त्यादिवशी श्री स्वामी अतिशय आनंदात होते. तसेच दुरून गजानन महाराजांना (१७-१८ वर्षे वयाचे) येताना पाहून ते अतिशय आनंदाने उद्गारले, "गणपती आला रे!" त्यावर त्यांनी गजानन महाराजांना स्वतःच्या मांडीवर बसवून घेऊन त्यांचे प्रेमाने स्वागत केले. असे सांगितले जाते की केवळ एकच महिना गजानन महाराजांना स्वतःजवळ ठेऊन घेतल्यानंतर श्री स्वामींनी त्यांना कपिलधारा तीर्थाजवळील जंगलात जाऊन तपःश्चर्या करण्याचा आदेश दिला आणि श्री रघूनाथदास महंत ह्यांच्याकडे जाऊन (जे त्याच भागात होते) आध्यात्मिक साधनेची सुरुवात करण्यास सांगितले. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार महाराजांनी [[नाशिक|नाशिकजवळील]] [[कपिलधारा तीर्थ|कपिलधारा तीर्थाजवळील]] घनघोर जंगलात बारा वर्षे कठोर [[तपश्चर्या]] केली व ते परमोच्च स्थितीस पोचले. त्यावर असे सांगितले जाते की स्वामी समर्थांनी त्यांना [[नाशिक|नाशिकच्या]] देव मामलेदार (हे देखिल [[श्री स्वामी समर्थ|स्वामी समर्थांच्या]] श्रेष्ठ शिष्यांपैकी एक होते) ह्यांच्याकडे पाठविले. त्यांच्याकडे काही काळ राहून महाराज जगदोद्धाराकरिता शेगांवला आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले.
 
[[शेगांव]] येथे प्रकट होण्यापूर्वी महाराज [[अक्कलकोट]] येथे स्वामी समर्थांकडे काही दिवस मुक्कामास होते. स्वामीसमर्थांनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी [[सटाणा]] येथील थोर सत्पुरूष देव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले . त्यांच्याच सूचनेनुसार महाराजांनी पुढे आपले कार्यक्षेत्र [[शेगांव]] येथे निश्चित केले <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2821071.cms श्री गजानन महाराजांविषयी श्री देव मामलेदार यांच्या चरित्रात असा उल्लेख आहे.]</ref> .