"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३३:
जेलीफिश , जलव्याल आणि प्रवाळ यासारख्या प्राण्यामध्ये विखुरले गेलेले चेतापेशींचे जाळे आहे. इतर प्रगत बहुपेशीय प्राण्यासारखी मध्यवर्ती चेतासंस्था त्यांच्यामध्ये विकसित झाली नाही. जेलिफिशमध्ये चेतापेशींचे जाळे शरीरभर विखुरलेले आहे. या चेतापेशीमध्ये संवेदी चेतापेशी रासायनिक, स्पर्श आणि प्रकाश संवेद सहयोगी चेतापेशीद्वारे प्रेरक चेतापेशीकडे नेतात. प्रेरक चेतापेशी त्यानंतर शरीराची हालचाल नियंत्रित करतात. काहीं अरीय सममित प्राण्यामध्ये सहयोगी चेतापेशी एकत्र येऊन गुच्छिका तयार झाल्या आहेत.
चेतासंस्थेचा अरीय सममित प्राण्यामधील चेतासंस्थेचा विकास बाह्यस्तर पेशीपासून झाला आहे.बाह्यस्तर पेशी या शरीरातील बहुतेक सर्व बाह्यस्तर पेशींचा उगम आहेत.
 
'''द्विपार्श्व्सममित चेतासंस्था :'''
सध्या मोठ्या संख्येने आस्तित्वात असलेल्या सजीवापैकी बहुतेक द्विपार्श्वसममित आहेत. द्विपार्श्वसममित म्हणजे शरीराची डावी आणि उजवी अशा दोन बाजू. आरशातील प्रतिमेप्रमाणे शरीराची रचना असणे. कॅंब्रियन काळातील 550-600 दशलक्ष वर्षापूर्वीच्या पूर्वजापासून द्विपार्श्वसममित प्राणी बनले असावेत. प्रारूपिक द्विपार्श्वसममित प्राणी म्हणजे एका नलिकेसारख्या आकाराच्या सजीवात तोंड आणि गुद याना जोडणारी अन्न नलिका. तंत्रिका रज्जू किंवा चेता रज्जू मध्ये प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका. चेतारज्जूच्या पुढील बाजूस असलेल्या मोठ्या गुच्छिकेस मेंदू म्हणतात.
सस्तन प्राण्यामध्ये चेतासंस्थेच्या पातळीवर गुच्छिकेवर आधारित आराखडा द्विपार्श्वसममित खंडीय प्राण्यासारखाच राहिलेला आहे. मेरुरज्जू मध्ये असलेल्या खंडीय गुच्छिके मधून संवेदी आणि प्रेरक चेता त्वचा, आणि त्वचेखालील स्नयूपर्यंत गेल्या आहेत. अवयवाना नियंत्रित करणा-या चेता गुंतागुंतीच्या असल्या तरी घडातील चेता मध्ये अरुंद चेता पट्टे आढळतात. मेंदूचे प्रमस्तिष्क, मस्तिष्कस्तंभ आणि निमस्तिष्क असे तीन भाग असतात.
द्विपार्श्वसममित प्राण्यांचे दोन प्रमुख गट पडतात. हे गट गर्भावस्थेपासूनच परस्परापासून वेगळे झाले आहेत. अशेरुकी प्राण्यांचा एक गट आणि कशेरुकी प्राण्यांचा दुसरा. यातील अकशेरुकी गटामध्ये अधिक वैविध्य आहे. अकशेरुकी गटात संधिपाद प्राणी, वलयांकित आणि सर्व कृमी, मृदुकाय प्राणी यांचा समावेश होतो. दोन्ही गटामध्ये चेतासंस्थेच्या शरीरातील स्थितीमध्ये भिन्नता आहे. अकशेरुकी गटातील प्राण्यामध्ये चेतासंस्था अधर बाजूस तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व बाजूस आहे. प्रत्यक्षात शरीरातील अनेक अवयव कशेरुकी आणि अकशेरुकी प्राण्यामध्ये परस्परांच्या विरुद्ध बाजूस असतात. उती विस्तारासाठी असलेल्या जनुकामुळे असे घडले आहे. कीटकांच्या उतीविस्तार जनुकांचा अभ्यास केल्यानंतर जिओफ्रॉय सेंट हिलारी या शास्त्रज्ञाने याचा प्रकाराचा प्रथम उल्लेख केला. उदाहरणार्थ कीटकांची चेतासंस्था अधर मध्य रेषेवर तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व मध्यरेषेवर असते.
 
'''कृमि चेतासंस्था'''
 
वलयांकित कृमी द्विपार्श्वसममित प्राण्यापैकी तुलनेने कमी किचकट शरीराचे आहेत. गांडुळासारख्या प्राण्यामध्ये शरीराच्या लांबीच्या दोन मज्जारज्जू असतात. शरीराचा अग्रभाग आणि पार्श्वभागामध्ये दोन्ही रज्जू एकत्र येतात. प्रत्येक खंडात मज्जारज्जू आडवे जोडलेले असतात. त्यामुळे शिडीसारखी त्यांची रचना दिसते. मज्जारज्जू शिडीसारखे जोडलेले असल्याने शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे नियंत्रण सुलभ होते. अग्रभागामधील एकत्र आलेल्या दोन गुच्छिका मेंदूसारखे कार्य करतात. अग्रभागा जवळील प्रकाशसंवेदी भाग प्रकाश संवेद चेतासंस्थेकडे पाठवितो.
सीनो-हॅब्डायटिस एलेगॅन्स नावाच्या एका लहान सूत्रकृमीच्या चेतासंस्थेचा अनुबंध पातळीपर्यंत अभ्यास झालेला आहे. याच्या चेतासंस्थेमधील प्रत्येक चेतापेशी कशी आणि कोठे जोडली आहे हे आता समजले आहे. चेतासंस्थेमधील बहुतेक पेशी कशा प्रकारे परस्पराशी संपर्क ठेवतात हे त्यामुळे समजले. नर आणि मादी सीनो‌-हॅबडायटिस सूत्रकृमी मधील चेतसंस्थेमध्ये बदल आहे. याला लिंगप्रभेदन म्हणतात. लिंग संबंधी कार्य करण्यासाठी हा बदल असावा. नरामध्ये 283 चेतापेशी, तर उभयलिंगी सीनो-हॅबडायटिस मध्ये 302 चेतापेशी आहेत.
 
 
 
== प्रतिक्षिप्त क्रिया ==