"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १९:
 
==तंत्रज्ञान==
एलईडी बनवतांना निर्माण होणारा प्रकाशाचे रंग हे त्याच्या तरंगलांबी वर अवलंबुन असतात. तेव्हा अपेक्षित तरंगलांबी चे फोटोन्स मिळवण्यासाठी P आणि N भागातल्या अर्धवाहक पदार्थाच्या इलेक्ट्रॉन्स च्या पातळीत पुरेसा फरक असावा लागतो. त्यानुसार वेगवेगळे अर्धवाहक पदार्थ निवडावे लागतात. एलईडी हा जर मुक्त पणे हवेत ठेवला व त्यास विद्दुत पुरवठा केला तर आपणास प्रकाश मिळु शकणार नाही. याचे कारण म्हणजे प्रकाशाचा रिफ्रेक्टिव इंडेक्स ( निर्देशांक) (refractive index) हा गुणधर्म. जेव्हा प्रकाश एका माध्यमातुन दुसर्‍या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा तो काही अंशानी आपला मार्ग बदलतो. दोन माध्यमांच्या रिफ्रेक्टिव इंडेक्स मधील फरक जेवढा मोठा तेवढा प्रकाशाचा मार्ग बदल्याण्याचा कोन मोठा. जेव्हा इलेक्ट्रॉन फोटॉन्स निर्माण करतात तेव्हा ते एलईडी च्या अंतर्भागात संचार करत असतात. म्हणजे त्यावेळी त्यांचे संचारमाध्यम असते अर्धवाहक पदार्थचे. यांचा रिफ्रेक्टिव इंडेक्स हवेच्या तुलनेत फार मोठा असतो. हवेचा रिफ्रेक्टिव इंडेक्स साधारण १ आहे. त्यामुळे प्रकाश अर्धवाहक पदार्थातुन म्हणजे त्याच्या पृष्ठभागातुन बाहेर हवेत न येता आतल्या आत परावर्तित होतो. हे टाळण्यासाठी अर्धवाहक पदार्थावर पुरेसा रिफ्रेक्टिव इंडेक्स असणार्‍या प्लास्टिकचे आवरण करण्यात येते. "अर्धवाहक पदार्थ व प्लास्टिक" आणि "प्लास्टिक व हवा" यांच्या रिफ्रेक्टिव इंडेक्स मधील फरक हा "अर्धवाहक पदार्थ व हवा" यांच्या रिफ्रेक्टिव इंडेक्सच्या फरकाच्या तुलनेत कमी असल्याने प्रकाश प्रथम अर्धवाहक पदार्थातुन प्लास्टिक व त्यातुन हवेत मिसळतो.
==प्रकार==
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/एलईडी" पासून हुडकले