"एटीएम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{विकिकरण}}
==एटीएम् अर्थात् धनयंत्र==
बँकेच्या चार भिंतींबाहेर, ग्राहकास आपल्या खात्यावरील रक्कम कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय काढून देणारे संगणकीकृत दूरसंचारयंत्र म्हणजे धनयंत्र किंवा एटीएम्. ग्राहकाच्या बँक खात्याशी या धनपत्राची संगती जोडलेली असते. ग्राहकाची ओळख पटविण्याकरिता त्याला दिलेल्या धनपत्रासोबत एक पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर (PIN) दिलेला असतो. वैध धनपत्र व योग्य PIN असेल तरच व्यवहार पूर्णत्वास जातो. सोपेपणा, व्यवहार्यता, विश्वसनीयता आणि अचूकता या आर्थिक व्यवहारांकरताच्या अत्यावश्यक बाबींची धनपत्र पूर्तता करते.
Line ३३ ⟶ ३४:
 
अखेर बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेपुढे ही सारी वस्तुस्थिती मांडली. धनयंत्रांचा निःशुल्क वापर आतबट्ट्याचा ठरतो आहे असे निःसंदिग्धपणे सांगत त्यांनी तीन पर्याय सुचविले. एक पर्याय होता व्यक्तिगत खात्यावर फक्त रु 5000/- पर्यंतचे व्यवहार निःशुल्क तर व्यावसायिक खात्यावरील प्रत्येक व्यवहारावर शुल्क आकारणी. दुसरा पर्याय की सरसकट रु. 5000/-पेक्षा अधिकच्या प्रत्येक व्यवहारावर शुल्कआकारणी, तर तिसरा पर्याय हा, की वार्षिक ठराविक व्यवहार फक्त निःशुल्क. ग्राहकहित आणि व्यावसायिक गणित यांचा तोल सांभाळत अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला. त्यानुसार, रु. 10000/- पेक्षा अधिक रकमेवर सरसकट शुल्क पडेल, दरमहा रु. 10000/- च्या आतले 5 व्यवहार निःशुल्क राहतील. अन्य बँकेच्या धनयंत्रावरुन वरुन पैसे काढण्याची मर्यादा 10000/- एवढी आखली जाईल. 15 ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू होईल.
 
[[वर्ग:यंत्रे]]
[[वर्ग:बँकिंग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/एटीएम" पासून हुडकले