"खंडोबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०५३ बाइट्सची भर घातली ,  १२ वर्षांपूर्वी
छो (सांगकाम्याने वाढविले: pl:Khandoba)
 
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. [[एकनाथ|एकनाथांनी]] या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून ''कमी प्रतीचे दैवत'' मानले गेले. खेळखंडोबा हा वाक्प्रचार ''सर्वनाश'' या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रीविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.
 
[[महात्मा फुले]] यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील [[महाराष्ट्र]] क्षेत्राचा अधिपती मानले आहे. [[महाराष्ट्र]] क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. [[जेजुरी]]चा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तण्ड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.<ref>महात्मा फुले समग्र वाड्.मय प्रकाशक साहित्य आणि संस्कृती मंडळ सहावी आवृत्ती पृष्ठ १५९ </ref>
 
जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली [[खटाव]]च्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. <ref>माटे</ref> बंगाली संत [[चैतन्य महाप्रभू]] यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, [[मल्हारराव होळकर]] वगैरेंचे उल्लेख येतात. [[नारायणराव पेशवे|नारायणरावाच्या]] हत्येनंतर [[नाना फडणीस]] यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे [[पेशवे]] दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला. <ref>माटे</ref>
१,२५९

संपादने