"सल्फर डायॉक्साइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ro:Dioxid de sulf
छोNo edit summary
ओळ १:
'''सल्फर डायॉक्साईड''' हा एक विषारी वायू आहे.
 
सल्फर डायॉक्साईड (SO2)कोळश्यात असणार्‍या तसेच रॉकेल मध्ये असणारे सल्फर जेव्हा कोळसा जळतो तेव्हा सल्फरचेही ऑक्सिडेशन होते व सल्फर डायॉक्साईड तयार होते. सल्फर डायॉक्साईड हे पाण्यात लवकर विरुन जाते. जर हवेत सल्फर डायॉक्साईडचे प्रमाण जास्त झाले व त्याकाळात पाऊस पडला तर त्याचे पाण्यामध्ये मिसळून सल्फुरिक अम्ल तयार होते व यालाच आम्लयुक्त पाऊस म्हणतात. अम्लयुक्त पावसाने पिकांवरती मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जमीन अम्लयुक्त होते व हळूहळू नापिक बनते. अम्लयुक्त पावसाने सल्फरची इमारतींच्या मटेरिअलवर रासायनिक क्रिया होऊन इमारतींचे आयुष्य कमी होते. सफ्लर डायॉक्साईड जेव्हा श्वसनावाटे नाकपुडींमध्ये जातो तेव्हा श्वसननलिकेतील पेशी सल्फर डायॉक्साईडला फुप्पुसापासून पोहोचण्यापूर्वी कफातील पाण्यात विरुन टाकतात. जर याचे प्रमाण जास्त झाले तर नलिकेत अजून जास्ती कफ होतो व सर्दी होते.
सल्फर डायॉक्साईड हा कोळश्याच्या ज्वलनाने होत असल्याने याचे प्रमाण वीट भट्या, वीज निर्मिती प्रकल्पांजवळ जास्त असते. परंतु वार्‍याबरोबर लांबवर वाहून जाण्याची क्षमता असल्याने. अतिदूरवरही सल्फर डायॉक्साईडचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. सल्फर डायॉक्साईडचे प्रदूषण कमी करण्यासाठी नागरी वस्तींमध्ये रॉकेलचा कमी वापर, विजनिर्मिती प्रकल्पात सल्फरहित कोळसा वापरणे व धूर हवेत सोडण्यापूर्वी सल्फर स्क्रबर मधून त्याचे शुद्दीकरण करणे इत्यादी उपाय आहेत. जर हे उपाय अमलात आणले तर सल्फर डायॉक्साईड व अम्लयुक्त पावसावर नियंत्रण नक्कीच मिळवता येते.
 
[[वर्ग:ऑक्सिजनची संयुगे]]