"विनायक पांडुरंग करमरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छोNo edit summary
ओळ २५:
| तळटिपा =
}}
'''विनायक पांडुरंग करमरकर''', ऊर्फ '''नानासाहेब करमरकर''', ([[ऑक्टोबर २]], [[इ.स. १८९१]]; सासवणे, [[रायगड जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - [[जून १३]], [[इ.स. १९६७]]) हे [[मराठी]] शिल्पकार होते. [[मुंबई]]च्या [[सर जे.जे. कला विद्यालय|सर जे.जे. कला विद्यालयात]] ते शिल्पकला शिकले. शिल्पकलेतील योगदानाबद्दल भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६२ साली त्यांना [[पद्मश्री पुरस्कार]] देऊन गौरवले. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अलिबागजवळील सासवणे गावात त्यांच्या घरी शिल्पकारांचे करमरकर संग्रहालय उभारण्यात आले आहे. अलिबाग-रेवस रोड येथून १८ किमी अंतरावर स्थित एक संग्रहालय आहे जिथे कै. नानासाहेब करमरकर यांनी बनवलेले शिल्पकार त्यांच्या स्वतःच्या बंगल्यात प्रदर्शित केले आहेत. येथे सुमारे १५० सुंदर कोरीव शिल्पे प्रदर्शित आहेत.
 
==कार्य==
भारतातील वास्तववादी शिल्पकारांमधील अग्रगण्य शिल्पकार म्हणून महाराष्ट्रातील नानासाहेब ऊर्फ विनायक पांडुरंग करमरकर ख्यातनाम आहेत. अश्र्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझमधील साडेतेरा फूट उंचीचा एकसंध पुतळा त्यांनी घडवला. अशा प्रकारचा पुतळा घडवणारे ते भारतातील पहिले शिल्पकार ठरले. सजीवता आणि सादृश्यता ही त्यांच्या शिल्पांतील वैशिष्ट्ये मानली जातात.