"मासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो PAGENAME → लेखाचे नाव
ओळ १५:
 
== शरीररचना ==
माशाचे शरीर साधारणपणे लांबट, दोन्ही टोकांस निमुळते व प्रवाहरेखित म्हणजे पाण्यात फिरताना कमीतकमी प्रतिरोधी असे असते. माशाच्या शरीराचे मस्तक (डोके), धड व पुच्छ (शेपटी) असे तून भाग पडतात. पुच्छाच्या टोकास पुच्छपक्ष असतो. मस्तक किंवा डोक्याच्या पुढच्या टोकास जबडा, वर नासाद्वारांची (नाकपुड्यांची) जोडी आणि दोन्ही बाजूंस लकाकणारे पाणीदार डोळे असतात. डोक्याच्या पश्चभागी दोन्ही बाजूंस, वर प्रच्छद असलेले क्लोमकक्ष (कल्ल्यांचे कप्पे) असतात. या कक्षांत लालबुंद क्लोम असतात. यांच्याद्वारेच मासे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे शोषण करून श्वसन करतात. हे माशांचे वैशिष्ट्यपूर्ण इंद्रिय आहे [⟶ क्लोम]. प्रच्छदाच्या पश्च कडेपर्यंत डोक्याची लांबी मानली जाते. या दोन्ही क्लोमकक्षांच्या मध्यभागात शरीरांतर्गत हृदय असते. डोक्याच्या पुढच्या मध्यभागात हाडांच्या कवटीत लांबटसा मेंदू असतो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या मेंदूच्या कवटीस जोडून निरनिराळ्या मणक्यांचा बनलेला पृष्ठवंश (पाठीचा कणा) पुच्छभागापर्यंत जातो व त्यात असणाऱ्या मेरु नालेतून मेंदूपासून निघणारा मेरुरज्जू पुच्छापर्यंत जातो. प्रच्छदाच्या दोन्ही बाजूंस वरच्या भागात हाडांच्या बंदिस्त पोकळीत श्रवणेंद्रिये असतात. माशांना बाह्यकर्ण नसतो. त्यांच्या शरीरावर निरनिराळ्या भागांत पक्ष असतात. पाठीवर एक किंवा कधीकधी दोन पृष्ठपक्ष, खांद्याच्या भागात प्रत्येक बाजूस एक अशी अंसपक्षांची जोडी, खाली पोटाजवळ श्रोणिपक्षांची जोडी, धडाच्या शेवटी मध्यस्थ असा गुदपक्ष व पुच्छ भागात पुच्छपक्ष अशी ही निरनिराळ्या पक्षांची रचना असते. श्रोणिपक्षामागे अधर मध्यभागी गुदद्वार व जननरंध्र असते. धडाच्या देहगुहेत (शरीराच्या पोकळीत) जठर, आतडे वगैरे पचन तंत्राचे (पचन संस्थेचे) भाग, हृदय, यकृत, वृक्क (मूत्रपिंड), जनन ग्रंथी इ. शरीराचे महत्त्वाचे अवयव सामाविलेले असतात. [[File:White shark.jpg|thumb|400px|[[शार्क|शार्क {{PAGENAME}}मासा]]|अल्ट=]]
 
== जीवनवृत्त ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मासा" पासून हुडकले