"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८:
 
== शैव धर्म ==
शैव आगमांनुसार एकूण ६४[[चौसष्ट भैरव|चौसष्ट भैरवांचे]] आठ वर्ग असून त्या वर्गांच्या आठ प्रमुखांना ‘[[अष्टभैरव|'''अष्टभैरव''']]’ असे म्हणतात. तंत्रग्रंथांनुसार ६४ भैरव हे ६४ [[योगिनी|योगिनींचे]] स्वामी असतात. तर या सर्व भैरवाचे प्रमुख म्हणजे कालभैरव आहेत असे मानले जाते. अष्टभैरवांच्या नावांविषयी बरेच मतभेद आहेत. संहार वा महासंहार, असितांग, रूरू, काल, क्रोध, ताम्रचूड, कपाल, चंद्रचूड, रुद्रभैरव, चंड, उन्मत्त व भीषण या नावांपैकी वेगवेगळ्या आठ नावांचा अष्टभैरवांत समावेश केला जातो.<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-02|title=भैरव|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5&oldid=4426480|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> विद्या, काम, नाग, स्वच्छंद, लम्बित, देव, उग्र व विघ्न या प्रत्येकाला शेवटी ‘राज’ हे पद जोडूनही ही यादी केली जाते. शांतिकर्मात व शैव व्रताच्या उद्यापनात अष्टभैरवांना आहुती दिली जाते.
 
अष्टभैरवांपैकीचौसष्ट भैरवाचे प्रमुख असलेल्या कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. त्याला पापभक्षण, आमर्दक, काळराज इ. नावेही आहेत. काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यावयाचे व परतताना त्याच्या नावाचा काळा गंडा बांधावयाचा, अशी प्रथा आहे. उज्जैनजवळील भैरवगढ या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमी ही कालभैरवाष्टमी म्हटली जाते. आश्विन, कार्तिक व भाद्रपद वद्य अष्टमीला कालाष्टमी हे त्याचे व्रत केले जाते. शेंदूर व तूप यांनी संतुष्ट होणारा एक बालभैरवही आहे. [[नेपाळ|नेपाळमधील]] नेवार लोक वीरभद्राचे रूप असलेल्या पाचलीभैरवाची पूजा करतात. सूर्य व शिव यांचे संयुक्त स्वरूप असलेल्या मार्तंडभैरवाची त्रिमुखी मूर्ती आढळली आहे. शिवाचे बटुकभैरव नावाचे एक तामसरूपही आढळते. दक्षिण भारतातील शैव मंदिरांची रक्षकदेवता असलेल्या क्षेत्रपालाला महाभैरव म्हणतात. राजस्थानात भूतपिशाचांना ताब्यात ठेवणारे काला व गोरा असे दोन भैरव असून माघ महिन्यात त्यांचा लोकोत्सव असतो. मुसलमान लोक यतिभैरवाची उपासना करतात.
[[चित्र:काल भैरव, वसन्तपुर दरवार क्षेत्र (Basantapur, Kathmandu) 23.jpg|इवलेसे|315x315अंश|काल भैरव, वसन्तपुर दरबार क्षेत्र (बसंतपूर, [[काठमांडू]],[[नेपाळ]] )]]
‘भीषण गोष्टींना भिवविणारा’ या अर्थाने विष्णू व शंकर यांना भैरवतर्जक म्हटले जाते. कालिकापुराणानुसार वारणासीचा राजा व खांडवनाचा निर्माता विजय हा भैरवाचा वंशज होता. भैरव हे नाव धारण करणारे भैरवपुराण, भैरवतन्य इ. ग्रंथ आढळतात. भीतीची भावना निर्माण करणाऱ्या संगीतातील रागाला भैरव असे नाव आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/काळभैरव" पासून हुडकले