"लिओनार्दो दा विंची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Hjjdjfikfjkrj
छो 2409:4042:4E0E:B1C1:1AC0:DF01:B3D6:5FC8 (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २७:
)काळात झालेला एक महान चित्रकार व संशोधक होता. कलेच्या इतिहासात त्याने संशोधक वृत्तीने दिलेल्या अमूल्य योगदानामुळे त्याचे नाव नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. लिओनार्दोने अनेक क्षेत्रांत योगदान दिले असले, तरी इतिहासात त्याचे नाव चित्रकार म्हणून ठळकपणे दिसते. [[मोनालिसा]], [[द लास्ट सपर]], [[मॅडोना ऑफ द रॉक्स]] ही त्याची काही जगप्रसिद्ध चित्रे आहेत. चित्रांवरून त्याचे तत्कालीन चर्च या धर्मसंस्थेसोबत असलेले मतभेद, उलट अक्षरे काढून लिहिण्याची सवय, नव्याने सापडलेल्या त्याच्या नोंदवह्यांतील आश्चर्यकारक माहिती व कित्येक विचारवंतांनी त्याचा अभ्यास करून मांडलेली मते, यांवरून लिओनार्दो विसाव्या शतकापासून काहीसा गूढतेच्या वातावरणात आला आहे. त्यातच त्याच्या विविध चित्रांचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून सुरू झाला. तत्कालीन सामाजिक, राजकीय व धार्मिक परिस्थितीचा अभ्यास केलेले विचारवंत त्याच्या चित्रांवरून वेगवेगळ्या संदेशांच्या कल्पना करतात. डॅन ब्राऊन या लेखकाने नुकतीच '[[दा व्हिंची कोड']] या काल्पनिक कादंबरीत लिओनार्दोची वेगळीच गूढ भूमिका मांडली.
 
== Bbeidhukdबालपण ==
लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरस अपत्Dअपत्य ofहोता. brtजन्मानंतर त्याचा सांभाळ ५ वर्षे आईनेच केला. त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करायची तयारी दर्शविली व याचवेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले. अशात लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला. त्याचे वडील सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे , देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला व्हेरोशिओ या प्रसिद्ध् चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने व्हेरोशिओकडे केला. याचवेळी त्याने स्वत:हून इतर शाखांचाही अभ्यास चालू ठेवला.
 
लिओनार्दो दा व्हि्न्ची हे प्रबोधनयुगातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला,स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व असले तरी तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. आपली चित्रे वास्तववादी बनावित यासाठी त्यांनी शरीर शास्त्राचा अभ्यास केला . मानवी चेहरे व शरीर कृतींवर त्याने मनापासून प्रेम केले. त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्या