"२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम सामना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
'''कसोटी क्रमांक २४२५''' (दोन हजार चारशे पंचवीसावा कसोटी सामना) हा [[भारत क्रिकेट संघ|भारत]] आणि [[न्यूझीलंड क्रिकेट संघ|न्यूझीलंड]] या दोन देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये १८-२३ जून २०२१ दरम्यान खेळवला गेलेला [[२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा|२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा]] अंतिम सामना होता. हा सामना [[इंग्लंड]]च्या [[साउथहँप्टन]] मधील [[रोझ बोल (क्रिकेट मैदान)|रोझ बोल]] या मैदानावर झाला. सुरुवातीला पाच दिवसांसाठी खेळवला जाणारा सामना पावसाचा व्यत्यत आल्यामुळे वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी राखीव दिवसाचा देखील वापर करण्यात आला. [[न्यूझीलंड क्रिकेट संघ|न्यूझीलंड]] ने अंतिम सामना ८ गडी राखून जिंकत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटनाच्या अवृत्तीचे विजेतेपद पटकावले. विजेत्या न्यूझीलंडला आणि उपविजेत्या भारताला अनुक्रमे १.६ दशलक्ष डॉलर्स आणि ८ लाख डॉलर्सचे रोख पारितोषिक देण्यात आले.
 
 
[[Image:2019–2021_ICC_World_Test_Championship_Final.jpg|thumb|center|200px|२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे अधिकृत चिन्ह]]
 
[[२००० आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी]]मध्ये विजयी झाल्यानंतर न्यूझीलंडचा हा आयसीसीच्या स्पर्धेतील दुसरे विजेतेपद होते. आयसीसी स्पर्धा जिंकणारा [[केन विल्यमसन]] हा [[स्टीफन फ्लेमिंग]]नंतरचा न्यूझीलंडचा दुसरा कर्णधार ठरला. अंतिम सामन्यात विजय मिळवताना विल्यमसन म्हणाला की हा एक “अतिशय विशेष प्रसंग व एक विलक्षण भावनेचा” क्षण होता. भारताचा कर्णधार [[विराट कोहली]]ने कबूल केले की न्यूझीलंड हा एक चांगला संघ होता. परंतु भविष्यात होणा विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा निर्णय घेण्यासाठी तीन पैकी सर्वोत्तम कसोटी सामन्यांच्या मालिकेद्वारे विश्वविजेता ठरविण्यात यावा अशी मागणी कोहलीने केली. सामन्यात ७ गडी मिळवत चांगली कामगिरी केल्याच्या जोरावर न्यूझीलंडच्या [[काईल जेमीसन]]ला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.