"विटी-दांडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नाही
छोNo edit summary
ओळ १:
विटी -दांडू हा मराठी मातीतील पूर्वीपासून खेळला जाणारा एक खेळ आहे . हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही खेळला जाई. प्रामुख्याने हा खेळ खेडोपाडी खेळला जातो . यामध्ये एक लाकडी दांडू असतो . व लाकडापासून तयार केलेली विटी असते .
हाॅकी
[[वर्ग:खेळ]]
विटी -दांडू हा मराठी मातीतील पूर्वीपासून खेळला जाणारा एक खेळ आहे .हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही खेळला जाई. प्रामुख्याने हा खेळ खेडोपाडी खेळला जातो . यामध्ये एक लाकडी दांडू असतो . व लाकडापासून तयार केलेली विटी असते .
 
विटीदांडू हा खेळ पारंपारिक असून खूप मजेशीर खेळ आहे. या खेळामध्ये झाडाचे लाकूड दांडू स्वरुपात वापरले जाते याशिवाय विटी साठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने टोक केले जाते.
 
खेळाचे स्वरूप :
 
खेळात खूप खेळाडू सहभागी होऊ शकतात . हा खेळ वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही पद्धतीने खेळता येतो.
 
ओलीसुकी (टॉस) करून राज्य कुणावर ते ठरवलं जातं. एखाद्या चपटय़ा खापरीला एका बाजूला थुंकी लावून ओलीसुकी केली जाते. जो ओलीसुकी जिकंतो तो पहिल्यांदा विटी उडवतो.
 
जमिनीवर छोटासा खड्डा खोदून (विटी साठी केलेल्या खड्ड्याला गल किंवा गली म्हणतात ) त्यावर विटी ठेवली जाते.
 
एक खेळाडू खड्यामधून विटी दांडूने दूर ढकलतो त्या वेळेस बाकीचे सर्व खेळाडू मैदानात विटी झेलण्यासाठी उभे असतात. त्यावेळेस जर कोणत्याही खेळाडूने विटी झेलली तर विटी मारणारा खेळाडू बाद होतो. विटीचा झेल घेता आला नाही, तर मग त्या गलवर दांडू आडवा ठेवायचा. मग प्रतिस्पर्धी खेळाडू त्याला विटीने मारण्याचा प्रयत्न करतात. जर दांडूला विटी लागली तर खेळाडू बाद. तो बाद झाला नाही तर मग त्याने विटीने गुण मिळवायचे.
 
यासाठी विटीच्या एका टोकावर दांडू मारून ती विटी हवेत उडवायची आणि जमिनीवर पडू न देता वरच्यावर उडवायची. विटी केवळ दांडूच्या सहाय्याने हवेत उडवणं हे या खेळातलं सगळ्यात मोठं कसब असतं.
Line २० ⟶ १८:
 
हा खेळाडू विटी घेऊन जाईल तिथून त्याने पार केलेल्या अंतराच्या प्रमाणात अंक मोजले जातात. विटी एकदाच मारली, तर हे अंतर दांडूने मोजलं जातं. विटी हवेत एकदा हलकेच उडवून मारली असेल तर अर्ध्या दांडूने हे अंतर मोजलं जातं आणि जर हवेतल्या हवेत दोनवेळा विटीला उडवलं असेल तर विटीने मोजायचं. साहजिकच ज्याचं कौशल्य जास्त असेल त्याचे गुण जास्त होतात.
[[वर्ग:खेळ]]