"अलेक्झांडर द ग्रेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १८०:
या काळात भारत तीन मोठ्या भागांत विभागला गेला होता. पहिल्या भागात [[तक्षशिला|तक्षशिलेचा]] राजा [[अंभी]] याच्या राज्याचा समावेश होणारी [[सिंधू नदी| सिंधू नदीच्या]] पश्चिमेकडील राज्ये होती, दुसर्‍यात [[पुरु | पुरु]](पोरस), या पौरव वंशातील राजाचे सिंधू नदीच्या पूर्वेकडील राज्य आणि तिसर्‍या भागात गंगेच्या खोर्‍यांतील प्रबळ [[मगध]] राज्य होते.
 
तक्षशिलेचा राजा अंभी याने अलेक्झांडर आणि त्याच्या सैन्याचे स्वागत केले. तक्षशिलेच्या मुक्कामात अलेक्झांडरने अनेक भारतीय विद्वानांशी चर्चा केल्याचे दिसून येते.या वास्तव्यात [[जम्मू आणि काश्मीर |काश्मीर]]चा राजा [[अभीसार]] याने अलेक्झांडरसमोर स्वत:हून शरणागती पत्करली परंतु [[पुरु|पुरू]]ने शरणागती पत्करण्यास साफ नकार दिला.
 
पुरु आणि अंभीच्या राज्यांच्या सीमेवर [[झेलम नदी]] (प्राचीन नाव: वितस्ता) होती. एकदा जूनचा महिना सुरू झाला आणि नदी दुथडी भरून वाहू लागली की ग्रीक सैन्याला नदी ओलांडणे अशक्य होणार आणि पैलतीरावर आपण सुरक्षित राहू,या कल्पनेत पुरु गाफील राहिला.