"दामूअण्णा मालवणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दामूअण्णा बापूशेठ मालवणकर''' ([[८ मार्च]], [[इ.स. १८९३|१८९३]]:[[निपाणी]] - [[१४ मे]], [[इ.स. १९७५|१९७५]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे मराठी चित्रपट-नाटकांतून बव्हंशी विनोदी भूमिका करणारे नट होते. ते नायकाची तसेच खलनायकाची भूमिकासुद्धा करीत. त्यांचाएकत्यांचा एक डोळा चकणा होता, त्यामुळे प्रेक्षकांना ते विनोदी वाटत असे.
 
नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांत विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्दङ्गेकशब्दफेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते.
 
दामूअण्णा मालवणकरांची मुलगी भारती मालवणकर ही [[हृदयनाथ मंगेशकर]] यांची पत्नी आहे. तिला जेव्हां [[पु.ल. देशपांडे]] यांनी पहिल्यांदा पाहिली, तेव्हां ते उदगारले, "ही मुलगी दामुअण्णांचा डोळा चुकवून जन्माला आली असणार!'
 
==पूर्वजीवन==
मालवणकर यांचा जन्म निपाणी येथे झाला. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ यांची अपेक्षा होती. पण दामूअण्णांना लहानपणापासूनच नाटकांचे वेड होते. घरातून या नाटकवेडाला विरोधच होता. त्यामुळे दामूअण्णा चोरून नाटके पाहत असत. त्यांनी तरुणपणी घरातून पळून जाऊन महाराष्ट्र कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी त्यांना परत आणून सोनारकामात लक्ष घालण्यास भाग पाडले. १९१३ साली ते पुन्हा एकदा घरातून बाहेर पडले आणि सांगलीला चित्ताकर्षक मंडळीत गेले. तिथे त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली. चित्ताकर्षक कंपनीत दामूअण्णांना नाटकांच्या जाहिरातींचे फलक ढकलगाडीवर घालून रस्त्यावरून फिरवून आणण्याचे काम दिले गेले. पडतील ती कामे करण्यात त्यांचा वेळ जात असे. काही काळानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या ‘त्राटिका’ या नाटकात दामूअण्णांना शिंप्याची भूमिका दिली गेली. ती भूमिका अगदी छोटी होती, मात्र त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. हे साल होते १९१५. पुढे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामूअण्णा लोकमान्य नाटक मंडळीत गेले. तिथे त्यांनी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशूची भूमिका अगदी तडफेने केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरुवात झाली.
 
१९१८ साली दामूअण्णा मालवणकर [[केशवराव भोसले]] यांच्या ललितकलादर्श मंडळीत गेले. तेथे त्यांना काम मिळाले नाही, तेव्हातेव्हां ते [[दीनानाथ मंगेशकर|दीनानाथ मंगेशकरांच्या]] बलवंत नाटक मंडळीत गेले. त्या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्त खड़्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ वगैरे नाटकातनाटकांत भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पुढे १९३३-३४ साली बलवंत नाटक कंपनी बंद पडली आणि त्याचेच चित्रसंस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे दामूअण्णा [[दीनानाथ मंगेशकरांकडेचमंगेशकर]]ांकडेच राहिले. १९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका देण्यात आली. चित्रपटातल्याचित्रपटांतल्या त्यांच्या कामांची हीच सुरुवात होती. पुढे ३-४ वर्षात ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.
 
त्यानंतर १९३८ साली ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी मा.मास्टर विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात आश्रम चालकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे त्यांना चांगले नाव मिळाले. मा. विनायक यांच्याविनायकांच्या चित्रपटातच त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. विनोदी चित्रपटांचे नवे दालनच उभे करण्यात मा. विनायक यांना दामूअण्णा मालवणकरांनी मदत केली. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रॅंडीची बाटली’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘बगाराम’च्या भूमिकेत त्यांना आपल्या विनोदी अभिनयाला पूर्ण वाव देता आला आणि ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सावकारी‘सरकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतूनही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. त्यानंतर मा. विनायक यांच्याकडे ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’‘[[अर्धांगी]]’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटांत, तसेच ‘सुभद्रा’, ‘बडी मॉं’ या हिंदी चित्रपटातचित्रपटांत विविध भूमिका केल्या. मा.[[मास्टर विनायक]] यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यासाठी खास विनोदी भूमिका असायचीच.
 
१९४७ साली मा.[[मास्टर विनायक]] यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनीदामुअण्णांनी ‘चूल आणि मूल’ या चित्रपटातूनचित्रपटात भूमिकाकाम केलीकेले. पुढे ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका केल्या आणि खर्‍याखऱ्या अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून स्वतःचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवायही अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात बिनपगारी, त्यानंतर दोन आणे रोजगारावर काम करत शेवटच्या काळात दामूअण्णा दोन हजार रुपये घेऊन भूमिका करीत असत.
 
चित्रपटातील लोकप्रियता शिगेला पोहोचली, तरीसुद्धा दामूअण्णांना नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. राजाराम नाटक मंडळीत गंगाधरपंत लोंढे दामूअण्णांना ‘भावबंधन’मधल्या ‘गोकुळ’च्या भूमिकेसाठी खास बोलावून घेत. त्या वेळी ते ३५० रुपये नाईटवर काम करत. १९४४ साली लोंढे यांचे निधन झाल्यावर दामूअण्णांनी ‘प्रभाकर नाटक मंडळी’ ही स्वतःची संस्था सुरू केली आणि वीर माधव जोशी यांचे ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणले. चित्रपटसृष्टीतले काम सांभाळून त्यांनी आठ वर्षे सार्‍यासाऱ्या महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग केले. १९५२ साली ही नाटक कंपनी बंद पडल्यावर दामूअण्णांनी चित्रपट याच आपल्या कार्यक्षेत्रावर पुन्हा भर दिला.
 
[[राम गणेश गडकरी]] यांचा ‘तिंबूनाना’, [[चिं.वि. जोशी]]ंचा ‘चिमणराव’ आणि ना.धों. ताम्हणकर यांचा ‘दाजी धडपडे’ हे तिन्ही मानसपुत्र साकार करत दामूअण्णांनी त्या व्यक्तिरेखांना अजरामर केले. त्यांनी जवळपास ७५ हिंदी-मराठी चित्रपटांतून व अंदाजे ५० नाटकांतून विनोदी भूमिका केल्या. वयाच्या ८३व्या वर्षी मुंबईत त्यांचे निधन झाले.
 
==दामूअण्णा मालवणकरांची भूमिका असलेली नाटके==
* उग्रमंगल
* त्राटिका
* पुण्यप्रभाव
* भावबंधन
* मृच्छकटिक
* विद्याहरण
* वेड्यांचा बाजार
* सन्यस्त खड़्ग’
* हाच मुलाचा बाप
 
==दामूअण्णांची भूमिका असलेले चित्रपट==
* अमृत
* [[अर्धांगी]]
* कृष्णार्जुन युद्ध
* गजाभाऊ
* गळ्याची शपठ
* चिमुकला संसार
* चूल आणि मूल
* ठकीचे लग्न
* देव पावला
* पहिली मंगळागौर
* माझे बाळ
* बडी माँ (हिंदी)
* बायको पाहिजे
* ब्रॅंडीची बाटली
* ब्रम्हघोटाळा
* ब्रम्हचारी
* मोरूची मावशी
* लग्न पहावे करून
* लक्ष्मीचे खेळ
* संगम
* सत्याचे प्रयोग
* सरकारी पाहुणे
* सुखाचा शोध
* सुभद्रा (हिंदी)
 
{{DEFAULTSORT:मालवणकर, दामूअण्णा}}