"जांभूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎जांभूळ: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो removed duplicate text
ओळ २९:
 
तशी मुंबईत ठायीठायी जांभळीची झाडे दिसतात. रस्ते कापताना जरा शोधक नजरेने पहात गेलात तर या झाडांची शहरातील दाटी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. यातील अनेक झाडे अगदी जुनी आहेत आणि भरपूर फळांनी लगडून जाणारी फोर्टमध्ये विद्यापीठालगतच्या ओव्हल मैदानाच्या कडेला तीन मोठे जांभूळ वृक्ष आहेत. उन्हाळ्यात तिथून चालणार्‍यांच्या पायाखाली येऊन जांभळांची शाई फुटपाथ रंगवत असते. वाळकेश्वर परिसर, दादर मधील अनेक रस्ते, चेंबूरच्या गल्या, अलीकडेच भरायला लागलेली उपनगरे, यातून भरपूर जांभळाची झाडे आहेत. अंधेरी ते दहिसर पट्ट्यात तर खूपच जांभूळ दाटी आहे. अंधेरी उड्डाण पुलाच्या अलीकडे एक प्रचंड ‘राजजम्बू’ आपल्या झुलत्या फांद्या मिरवत एकटाच उभा आहे. वांद्त्‍याच्या पाली हिल साहित्य-सहवास परिसरात या देखण्या वृक्षाचे दर्शन ठिकठिकाणी होते. राणीचा बाग, हॅंगिंग गार्डन, बोरीवलीचे राष्ट्रीय उद्यान, पवईचे उद्यान ही अनेक छोटी उद्याने जांभूळ वृक्षाचे संवर्धन करीत आहेत.
सुगंधी पाने असलेला, लोंबकळणाऱ्या वेलीसदृश फांद्या, तकतकीत सदाहरित पर्णसंभार असलेल्या वृक्षाचे पूर्वापार चालत असलेले नाव म्हणजे 'जंम्बू उर्फ राजजम्बू'. वृक्षाच्या नावातही रुबाब आहे. [[भीष्म]] पर्वात पितामह भीष्म म्हणतात. 'या जम्बूवृक्षांमुळेच या द्वीपकल्पाचे नाव जंम्बू द्वीप असे पडले'. [[रामायण|रामायणात]], बिरही श्रीराम दंडकारण्यात फिरताना आपली व्यथा या जम्बूवृक्षासही सांगतात. [[कालिदास|कालीदासांना]] मध्यभारतात जम्बूवृक्षाच्या राया नद्यांचे पाणी अडवताना दिसल्या, तर बाणभट्टांचा [[पोपट]] वैशंपायन [[कोकिळ|कोकिळाच्या]] डोळ्यासारखे लालबुंद असणार्‍या राजजम्बूच्या फळाचा रस चोरीत असे. यावरून एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की जम्बुवृक्ष हा सर्व भारतभर उगवतो. साहजिकच या वृक्षाची ओळख, इतर अनेक नावांनी करून दिली जाते. सुगंधी पानांचा हा वृक्ष सुरभीपत्र या नावासही पात्र आहे. [[लवंग|लवंगाची]] व [[निलगिरी (वनस्पती)|निलगिरीची]] झाडे याची कुलबंधू असल्याने हे कुल 'लवंगकुल' म्हणूनही ओळखले जाते.
 
== '''जांभूळ :''' ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जांभूळ" पासून हुडकले