"धर्मेश तिवारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: लेख निर्माण
खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१०:४१, १४ मे २०२० ची आवृत्ती


धर्मेश तिवारी (२७ एप्रिल १९५१-६ ऑगस्ट २०१४) हे भारतीय अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक होते.[१] ते दूरचित्रवाणी मालिका महाभारतमध्ये कृपाचार्य आणि चाणक्यमध्ये मलयराजच्या भुमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

धर्मेश तिवारी
जन्म २७ एप्रिल १९५१ (1951-04-27)
मृत्यू ६ ऑगस्ट, २०१४ (वय ६३)
चंदिगड, भारत
मृत्यूचे कारण मधुमेह
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारत
पेशा अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक
कार्यकाळ १९८४-२००८

त्यांनी हिंदी दूरचित्रवाणी मालिका कानूनमध्ये न्यायाधिशाची भुमिका साकारली.

त्यांनी २०१३ मध्ये महाभारत और बर्बरीक या मालिकेसाठी दिग्दर्शन व पटकथा लेखन केले.[२] हा त्यांचा शेवटचा प्रकल्प होता.

२००१ मध्ये, ते चित्रपट व दूरचित्रवाणी कलाकार संघटनेचे मानद महासचिव होते.

२००३ मध्ये, ते पश्चिम भारत चित्रपट कर्मचारी संस्था, या चित्रपट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष होते.[३]

२०१३ मध्ये धर्मेश यांनी प्रधानमंत्री या राजकीय कार्यक्रमाच्या एबीपी न्यूज वाहिनीच्या २६ भागाच्या मालिकेत जसवंत सिंहची भुमिकासुद्धा साकारली.

१० ऑगस्ट २०१४ ला ‌वयाच्या ६३ व्या वर्षी तिवारी यांचा मधुमेहाने मृत्यू झाला.[४]

संदर्भ

  1. ^ "सिंटा-धर्मेश तिवारी". सिंटा.नेट. Archived from the original on 29 सप्टेंबर 2013. 10 सप्टेंबर 2013 रोजी पाहिले.
  2. ^ "महाभारत और बर्बरीक". २०२०-०१-१९ रोजी पाहिले.
  3. ^ ललवाणी, विकी (२०१०-११-१२). "भुतपुर्व हे भुतपुर्व झाले". टाईम्स ऑफ इंडिया. ...धर्मेश तिवारी, पभाचिकसंचे अध्यक्ष व सिंटाचे मानद सचिव...
  4. ^ "अभिनेता धर्मेश तिवारीचे चंदिगडमध्ये ६३ व्या ‌वर्षी निधन". हिंदुस्थान टाईम्स. 8 जुलै 2014. Archived from the original on 7 ऑगस्ट 2014. 7 ऑगस्ट 2014 रोजी पाहिले.

बाह्य दुवे