"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
ओळ ४७:
==राधा==
[[ब्रह्मवैवर्तपुराण]] या ग्रंथात [[राधा]] ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे [[सांख्यशास्त्र|सांख्यशास्त्रातील]] [[प्रकृती]] व [[पुरुष]] होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. राधा विवाहित होती, तिच्या पतीचे नाव अनय.
 
==कृष्णाची आवड-निवड, त्याच्या जवळच्या खास वस्तू==
कृष्णाला फुलामध्ये पारिजातकाचे फूल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला (तुळशीची माळ) हीही त्याच्या आवडीची आहे. प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. कृष्ण हा उत्तम (रथाचा) सारथी होता.
 
शंखसुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांजजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला. त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.
 
==कृष्णाची मुले (एकूण ८०)==
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले