"सोलापूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ३०७:
 
सोलापूर चे कवी कुंज बिहारी यांनी १९२७ साली सांस्कृतिक विचार डोळ्यासमोर सारथी आणि राजश्री हि पत्रके सुरु केली , १९३८ च्या सुमारास चंदा वांगी यांनी दिव्यशक्ती हे पत्रक सुरु केले तर कम्युनिस्ट विचांराचे गो द साने , कऱ्हाडकर ,भाई छ्नुसिंह चंदेले यांनी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी १९३५ साली एकजूट हे पत्र सुरु केले ,१९३८ साली बार्शी येथून वीरशैव गर्जना तर काझी यांनी सोलापुरातून अनसार व तुफान हि पत्र १९३९ साली सुरु केली तर पंढरपुरातून १९४० साली भागवत धर्म हि धार्मिक पत्रही निघाले  .
कर्मयोगी वृत्तपत्र
1930 सालच्या सोलापुरातील मार्शल लोच्या काळात विशेष कामगिरी धडाडीने बजावणारे पत्र कर्मयोगी या सोलापूरच्या साप्ताहिकाची विशेष दखल घेणे जरूर आहे या पत्राला सतत ब्रिटिश सरकारशी सामना देतच मार्ग काढावा लागला शेवटी हे पत्र सरकारी रोष आलाच बळी पडले स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांना सरकारी बडग याच्या काळात कसा सतत सहन करावा लागत असे त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सोलापूरचा कर्मयोगी या पत्राचे संपादक रामचंद्र शंकर राजवाडे यांच्यामुळे त्या पत्राची कारकीर्द विशेष गाजली.
' कर्मयोगी' पत्र सुरू करावयाला विशेष चालना मिळाली ती 1920 साली न चि केळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या विसाव्या प्रांतिक परिषदेमुळे त्या परिषदेला लोकमान्य टिळक उपस्थित होते ब्राह्मणेतर व मवाळ यांनी सहकार्य करून परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता परिषद यशस्वी करण्याकरिता शेठ गुलाबचंद हिराचंद भाऊसाहेब खडकिकर देगावकर वकील गोविंद देव डॉ. गोगटे रामचंद्र शंकर राजवाडे गाडगे वकील इत्यादी मंडळी झटली होती परिषदेच्या संघटनेतूनच राष्ट्रीय विचार प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली स्वातंत्र्य चळवळीचे कार्य करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेच्या कार्याच्या प्रचारासाठी स्वतःचे ऐक वर्तमानपत्र असावे अशी कल्पना पुढे येऊन वृत्तपत्र काढण्याचा विचार हे निश्चित झाला या उपक्रमाचा एक भाग म्हणून रामभाऊ राजवाडे यांना संपादकीय कामाची माहिती घेण्यासाठी काही दिवस पुण्यात केसरी कार्यालयात पाठविण्यात आले होते पत्र काढण्याचा असा योजनापूर्वक प्रयत्न झाला होता.
रामभाऊ राजवाडे यांनी संपादकीय कामाची पुण्यात जाऊन माहिती घेतली असली तरी कर्मयोगी पत्राचे पहिले संपादक प्र बा बर्वे वकील हे होते पत्राचा पहिला अंक 26 नोव्हेंबर 1924 रोजी प्रसिद्ध झाला लोकल बोर्ड नगरपालिका व राजकीय प्रश्न हे त्या वेळचे विशेष महत्वाचे चर्चा विषय असत 1925 झाली कार्तिकी रथ मिरवणुकीच्या वेळी सोलापुरात जातीय दंगल झाली यामुळे कर्मयोगी पत्राला एका बाजूला सरकारी रोप व दुसऱ्या बाजूला जातीय भावना यातून मार्ग काढावा लागला पण हिंदूंच्या संघटनेच्या दृष्टीने कर्मयोगी ने निर्भयतेने कार्य केले कर्मयोगी काढण्यात पुढाकार घेणारी सारी मंडळी राष्ट्रीय वृत्तीची व टिळक केळकर पंतांची होती यामुळे कर्मयोगी पत्राने तोच बाणा कायम राखला पत्राची जबाबदारी पुढे रामभाऊ राजवाडे यांच्याकडे देण्यात आली ज्या ज्या देशाभिमान अन्यायाची चीड व निर्भिड विचार ही कर्मयोगी पत्राची वैशिष्ट्ये होती यामुळे लवकरच त्याचा सर्वत्र प्रसार होऊन सरकार दरबारीही त्याची जरब निर्माण झाली.
कायदेभंगाची चळवळ 1930 झाली सुरू झाल्यावर पाच मे रोजी गांधीजींना अटक झाल्याचा निषेध म्हणून सोलापुरात सभा मिरवणुका इत्यादी मार्गांनी लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शिंदेंची झाडे तोडून लोकांनी कायदे भंगही केला त्यातून दंगल उसळून पोलिसांनी गोळीबार केल्या व त्यात शंकर शिवदारे नावाचा इसम मारला गेला अनेक लोक ही जखमी झाले यामुळे लोक प्रक्षुब्ध होऊन त्यांनी चाटी गल्ली पोलिस चौकीवर हल्ला केला व जुने कोर्ट जाळले यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी मोटारीतून शहरभर गोळीबार केला व त्यात अनेक निरपराधी माणसे मारली गेली पोलिसांच्या या अत्याचाराची चीड येऊन कर्मयोगी चे संपादक रामभाऊ राजवाडे यांनी दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून माहिती मिळवली व ती सर्व नावाने शिवार कर्मयोगी चा ज्यादा अंक काढून त्यात प्रसिद्ध केली सरकारच्या अन्याय आणि अत्याचारी वागणूक चे दर्शन कर्मयोगिनी लोकांना घडविले अंकाच्या अक्षरशा हजारो प्रति खपल्या राजवाडे यांनी ऐनवेळी धैर्य दाखवून सरकारी अन्याय सविस्तर पुराव्यास पुढे मांडला लोकांची बाजूही मांडण्यात आली होती ते एक धाडसच होते राजवाडे व कर्मयोगी या दोघांनाही त्यांची जबरदस्त जव झळ लागण्याचा संभव होता कसोटी पाहणारा तो प्रसंग होता पण लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्राला कर्तव्य टाळता येऊ शकत नाही पोलिसी अत्याचाराला वाचा फोडण्याची गरज निसंशय होती कर्मयोगीने आपले कर्तव्य केले अनेक वृत्तपत्रांनी कर्मयोगी वरून पोलिसी अत्याचाराची माहिती प्रसिद्ध करून सरकार पुढे एक आव्हान उभे केले यामुळे चिडून जाऊन सरकारी अधिकाऱ्यांनी मार्शल लो पुकारण्यास वरिष्ठांना भाग पडले राजवाडे यांना अटक होऊन लष्करी कोर्टापुढे त्यांना उभे करण्यात आले सात वर्षे सक्तमजुरी व 10000 रुपये दंड अशी कडक शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली
राजवाडे यांना पकडल्यानंतर कर्मयोगी पत्र 5 6 महिने बंद राहिले 1930 च्या नोव्हेंबरमध्ये डॉ जगदेवराव देशमुख यांच्या संपादकत्वाखाली पत्रा काही दिवस देण्याचाही प्रयत्न झाला लष्करी कायद्याच्या काळात कर्मयोगी काही दिवस दैनिक स्वरूपातही निघत असे.
पुढे गांधी अर्विन समेट होऊन सर्व राज बंद्यांची सुटका झाली राजवाडे यांचीही बिनशर्त सुटका झाली सुटून आल्यावर राजवाडे यांनी पत्राची सूत्रे पुन्हा आपल्या हाती घेतली पण कर्मयोगी सरकारच्या डोळ्यात सतत खूपच असल्याने काहीतरी कारण काढून पत्राला अडचणीत टाकण्याचा अधिकार यांचा प्रयत्न असे 1931 च्या जूनमध्ये कर्मयोगी कडे सहा हजारांच्या जामीन मागण्यात आला चालक जा मीना बाबत विचार करीत असतानाच काँग्रेसची तडजोड झाल्याने जामीन कीचे गंडांतर टळले.
कर्मयोगी पत्र संपादन व व्यवस्थापन या दोन्ही दृष्टीने सुरळीत चालू लागले होते एक आदर्श जिल्हा साप्ताहिक असे स्वरूप या पत्राला प्राप्त झाले होते संपादक राजवाडे यांच्या जोडीला बाही बिके गो वा पाध्ये इत्यादी मंडळी काम करीत होते व्यवस्थापन पंडित व इतर मंडळींकडे होते छापखाना व पत्रे एकमेकांना पूरक ठरत होती पण पुढे लवकरच पत्रावर प्राणांतिक आपत्ती कोसळली.
 
== शिक्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सोलापूर" पासून हुडकले