"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ५८:
[[इ.स. १९५२]] साली [[अकोला जिल्हा|अकोला जिल्ह्यातल्या]] [[सिरसोली]] या छोट्याशा गावातील एका [[शिंपी]] कुटुंबात सत्यपाल चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ चिंचोळकर/चिंचोलीकर होते. त्यांचे वडील कपडे शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत. लहानपणीच सत्यपालांना भजनांची आवड लागली. तुकडोजी महाराजांची व गाडगे बाबांची कीर्तने ऐकत ते लहानाचे मोठे झाले आणि वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली.
 
अकोला जिल्ह्यातील [[अकोट]] गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. जेथे अस्वच्छता दिसते तेथे सत्यपाल महाराज स्वतः हातात झाड़ू घेऊन तो परिसर स्वच्छ करतात. सत्यपाल महाराज आपली खंजिरी वाजवून एखाद्या सार्वजनिक गावच्या ठिकाणी किंवा गावाच्या पारावर लोकांना एकत्र करतात आणि प्रबोधनाचे कीर्तन सुरू करतात. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे.
 
आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील [[चर्मवाद्य|चर्मवाद्याला]] विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करणे हा त्यांचा दिनक्रम आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/constitution-gave-the-right-to-life/articleshow/63850918.cms|title=संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times|date=2018-04-21|work=Maharashtra Times|access-date=2018-05-01|language=mr}}</ref>