"एर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Cleaned up using AutoEd
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृष्य संपादन: बदलले
ओळ ४४:
 
==इतिहास==
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती [[जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा|जे.आर.डी. टाटा]] ह्यांनी १९३२ साली टाटा सन्स नावाची कंपनी स्थापन केली. एप्रिल १९३२ मध्ये टाटांना [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश सरकारने]] हवाईमार्गाने टपाल वाहतूक करण्याचे कंत्राट दिले. १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटांनी एक टपालविमान [[कराची]]हून [[अहमदाबाद]]मार्गे [[मुंबई]]च्या [[जुहू विमानतळ]]ावर स्वत: चालवत आणले. टाटा एअरलाइन्सकडे सुरूवातीला केवळ दोन विमाने व एक वैमानिक होता. सुरूवातीच्या काळात कराची ते [[मद्रास]] दरम्यान टपालसेवा पुरवली जात असे. त्या वर्षी टाटांना टपालवाहतूकीमधून {{रुपया}} ६०,००० फायदा झाला. १९३७ सालापर्यंत हा फायदा ६ लाखांपर्यंत पोचला होता.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] २६ जुलै १९४६ रोजी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया ठेवण्यात आले व ती एक सार्वजनिक कंपनी बनली. स्वातंत्र्यानंतर १९४८ साली [[भारत सरकार]]ने एअर इंडियाचे ४९ टक्के समभाग विकत घेतले व त्याबदल्यात एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली. ८ जून १९४८ रोजी एअर इंडियाची मुंबईहून [[कैरो]] व [[जिनिव्हा]]मार्गे [[लंडन हीथ्रो विमानतळ|लंडन हीथ्रो]] ही पहिली आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली गेली व १९५० साली [[नैरोबी]] सेवा सुरू झाली. २५ ऑगस्ट १९५३ रोजी भारत सरकारने एअर इंडियामधील आपली गुंतवणूक वाढवली व बहुसंख्य भागीदारी प्रस्थापित केली ज्यामुळे एअर इंडिया सरकारी कंपनी बनली. एअर इंडियाचे अधिकृत नाव बदलून एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेड असे ठेवण्यात आले. ह्याच वर्षी [[इंडियन एअरलाइन्स]]ची स्थापना करण्यात आली व एअर इंडियाची सर्व देशांतर्गत विमानसेवा इंडियन एअरलाइन्सकडे वळवली गेली.
"https://mr.wikipedia.org/wiki/एर_इंडिया" पासून हुडकले